मुंबई : देशाची अग्रगण्य कंपनी टाटा ग्रुपचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी कोरोनाच्या संकटकाळात देशाला टाटा ट्रस्टकडून तब्बल दीड हजार कोटी रुपयांची मदत आणि टाटाचे ताज हॉटेल खुले करून दिले. रतन टाटा हे देशाच्या सर्वात मोठ्या उद्योग घराण्याचे सर्वाधिक काळासाठी प्रमुख राहिले आहेत. मात्र, त्यांना उतारवयात काही गोष्टींचे शल्य बोचत आहे. एवढ्या मोठ्या यशस्वी उद्योगपतीला त्यांनी करिअर न घडविल्याचे शल्य बोचत राहणे म्हणजे विशेष आहे.
फ्यूचर आँफ डिझाईन अँण्ड कन्स्ट्रक्शन या विषयावर सोमवारी पार पडलेल्या एका वेबिनारमध्ये रतन टाटा यांनी संबोधित केले. एकमेकांना खेटून असलेल्या झोपड्यांमध्ये लोकांना वास्तव्यासाठी ना पुरेशी जागा आहे, ना शुद्ध हवा. विकासक पुनर्विकासाच्या नावाखाली तिथे आलिशान इमारती उभ्या करतात आणि झोपडपट्टीवासीयांना दूरवर गगनचुंबी झोपड्यांमध्ये फेकतात. तिथेही त्यांना किमान पायाभूत मिळत नाहीत. कच-यासारखे एकत्र ठेवून जगणे अवघड झालेल्या लोकांना समाज संबोधले जाते. ही लाजिरवाणी बाब असल्याचे परखड मत टाटा यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी त्यांच्या मनावरील एक कायमचे राहिलेले ओझे सांगितले. मला लहानपणापासून आर्किटेक्ट व्हायचे होते. कारण हे क्षेत्र मानवतेच्या भावनांना खोलवर जोडलेले आहे. या क्षेत्रापासून मला प्रेरणा मिळते. मात्र, माझे वडील मला इंजिनिअर बनवू इच्छित होते. यामुळे मी वडिलांच्या इच्छेखातर इंजिनिअरिंगला गेलो. दोन वर्षे शिक्षण घेतल्यावर माझ्या लक्षात आले की मला आर्किटेक्टच व्हायचे आहे, असे टाटांनी सांगितले.
'' मी इंजिनिअरिंग अर्धवट सोडून आर्किटेक झालो. मात्र, संपूर्ण आयुष्य मी आर्किटेक्चर पासून लांबच राहिलो. मला आर्किटेक्ट न बनल्याचे दु:ख नाहीय, पण शल्य या गोष्टीचे आहे की मी हे काम पुढे सुरु ठेवू शकलो नाही.'', असे रतन टाटा यांनी सांगितले. रतन टाटा यांनी कॉरनेल आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून १९५९ मध्ये आर्किटेक्चरची पदवी घेतली होती. भारतात परतण्यापूर्वी ते लॉस अँजेलिसच्या एका आर्किटेक्ट कार्यालयामध्ये कामही करत होते. 1962 मध्ये त्यांनी टाटा समुहाचे कामकाज पाहण्यास सुरुवात केली होती.
आणखी वाचा...
कच्च्या तेलाची किंमत १ डॉलरपेक्षा खाली गेली खरी; पण भारताला फायदा काय?
'उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल'; उमा भारती संतांच्या हत्येवरून संतापल्या
योगी आदित्यनाथांच्या मावशीला सीमेवर रोखले; जिल्हाधिकाऱ्यांचा पासही होता
किम जोंग उन अत्यवस्थ?; हृदयविकारावरील शस्त्रक्रियेमुळे जिवाला धोका