बंगळुरू : ज्येष्ठ कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या मीच केली होती, मी त्यांच्यावर ५ सप्टेंबर २0१७ रोजी चार गोळ्या झाडल्या, अशी कबुली परशुराम वाघमारे यांनी पोलिसांना दिली. धर्मरक्षणासाठी एकाची हत्या करायची आहे, असे मला मे २०१७ मध्ये सांगण्यात आले होते. त्याला मी तयार झालो. मात्र ज्या व्यक्तीस मारायचे आहे, तिच्याविषयी मला माहिती नव्हती, असे वाघमारेने म्हटले आहे. या प्रकरणी चौकशीसाठी श्रीराम सेनचा जिल्हाध्यक्ष राकेश मठ याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.वाघमारेने पालिसांना सांगितले की, मला ३ सप्टेंबर रोजी बंगळुरू येथे नेण्यात आले. त्याआधी बेळगावात एअरगनचे प्रशिक्षण दिले. हत्येआधी तीनदा वेगवेगळ्या तिघांनी मला गौरी लंकेश यांच्या घराच्या परिसरात नेले होते. ते तिघे कोण होते, ते मात्र मला माहीत नाही. मला ३ सप्टेंबर रोजी गौरी लंकेश यांचे बंगळुरूच्या आर. आर. नगरमधील घर दाखवण्यात आले. दुसऱ्या दिवशीच गौरी लंकेश यांची हत्या करण्याचे ठरले होते. मात्र आम्हाला पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे आम्ही परत आलो.तिसºया दिवशी म्हणजे ५ सप्टेंबर रोजी दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास बंदुक देण्यात आली. मला एकाने दुचाकीवरून गौरी लंकेश यांच्या घरापर्यंत नेले. आम्ही तिथे वेळेत पोहोचलो. त्या कारमधून उतरण्याआधी मी त्यांच्या कारपाशी पोहोचलो. तिथे मी खाकरताच, त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्याबरोबर मी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, असा जबाब वाघमारेने दिला आहे. गोळ्या झाडल्यानंतर मी व इसम लगेच बाइकवरून निघालो. त्याच रात्री मी बंगळरू शहर सोडून बाहेर निघालो, असेही त्याने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)>या संघटनांशी संबंधितपोलिसांनी या प्रकरणात सनातन संस्था वा हिंदू जनजागृती समिती यांची थेट नावे घेतलेली नाहीत. मात्र आतापर्यंत ज्यांना अटक करण्यात आली वा ज्यांनी जबाब दिला आहे, ते सारे या संस्थांशी संबंधित आहेत. त्यांच्यापैकी काहींचा श्रीराम सेनेशीही संबंध आहे.
'गौरी लंकेश यांच्यावर मीच गोळ्या झाडल्या'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 3:45 AM