नवी दिल्ली : झारखंडमध्ये स्वामी अग्निवेश यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी केलेल्या मारहाणीनंतर भाजपला धारेवर धरण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक अनोखा उपाय शोधला. ओळखा पाहू मी कोण?च्या धर्तीवर ‘मी भय व विद्वेष पसरवतो. ओळखा पाहू मी कोण? हा उपरोधिक सवाल राहुल गांधी यांनी बुधवारी टिष्ट्वटद्वारे विचारला.‘मी सर्वात बलवान आहे. सामर्थ्य व सत्ता माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. सत्ता टिकविण्यासाठी मी विद्वेष व भीतीचा वापर करतो. मी दुर्बलांना नष्ट करतो. समोरचे माझ्याकरिता किती उपयोगाचे आहेत हे जोखूनच त्यांना त्याप्रमाणे मी वागवतो. ओळखा पाहू मी कोण?' असा सवाल विचारून राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे.स्वामी अग्निवेश यांना झालेल्या मारहाणीची बातमीही त्यांनी आपल्या टिष्ट्वटला जोडली आहे.>भाजपचे गुंड आता साधुसंतांनाही मारहाण करु लागले - तेजस्वी यादवमुसलमान, दलित, आदिवासी यांना मारहाण करणारे भाजपचे गुंड आता ७८ वर्षे वयाच्या आर्य समाजाच्या स्वामी अग्निवेश यांनाही चोप देऊ लागले आहेत. धर्माच्या आडून भाजप घाणेरडे राजकारण खेळत आहे.विरोधी विचारसरणीच्या लोकांबद्दल भाजप कार्यकर्त्यांच्या मनात द्वेषाची भावना आहे अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे युवा नेते व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एका टिष्ट्वटद्वारे केली आहे. लोकशाही व देशाला हे लोक कुुठे घेऊन जाणार आहेत अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.राहुल गांधीच्या टिष्ट्वटला उत्तर देणाऱ्यांपैकी काहींनी भाजपावर तोंडसुख घेतले, तर काहींनी राहुल व काँग्रेसवरच कडक टीका केली.
मी भय, विद्वेष पसरवतो, ओळखा पाहू मी कोण?- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 3:41 AM