रेसलिंग फेडरेशनचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध कुस्तीपटू गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआरही दाखल केली आहे. मात्र अटक न झाल्याने महिला कुस्तीपटू नाराज आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या विनेश फोगाटने सांगितलं की, मलाही इतर मुलींप्रमाणे खूप काही सहन करावं लागलं आहे. मात्र आता अध्यक्षांना अटक होईपर्यंत आम्ही आमचा लढा सुरू ठेवणार आहोत.
विनेश फोगाट म्हणाली की, आमचा लढा न्यायासाठी आहे. ही लढाई महिनाभरापासून सुरू आहे. मात्र आम्ही जंतर मंतरवर एक वर्षापासून आहोत, असं वाटतंय. आम्हाला इथे रात्रीच्या वेळी उकडतंय म्हणून किंवा मच्छर चावतात म्हणून नाही तर न्याय मिळण्याची प्रक्रिया खूप संथ आहे. एका अल्पवयीन मुलीसह ७ महिला कुस्तीपटू्ंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. जेव्हा आम्ही जानेवारीत आवाज उठवला होता, तेव्हा आमचं म्हणणं ऐकलं जाईल, असं आम्हाला वाटलं होतं. क्रीडा मंत्रालयाने तपासासाठी एका समितीची स्थापना केली होती, मात्र तो एक फार्स होता.
विनेशने सांगितले की, जानेवारीमध्ये जेव्हा बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि मी जंतर मंतरवर विरेध करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आम्हाला वाटलं की न्याय मिळण्यासाठी २-३ दिवसांपेक्षा अधिक वेळ लागणार नाही. महिला कुस्तीपटूंच्या सन्मानासाठी पुन्हा विरोध करावा लागेल, असे आम्हाला वाटले नव्हते. पीडितांना पुन्हा पुन्हा तेच तेच बोलावं लागणं हे त्याच वेदनेतून पुन्हा पुन्हा जाण्यासारखं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा जवळच आहेत. आम्हाला भारताचं प्रतिनिधित्व करायचं आहे आणि त्यात पदक जिंकायचं आहे. ही एक मोठी लढाई आहे. जर तुम्ही न्यायासाठी लढू शकला नाहीत तर तुमच्या गळ्यातील पदकांना काय अर्थ आहे.
विनेश फोगाट ने लिखा कि एक महीने बाद भी हमें कोई न्याय मिलता हुआ नहीं दिख रहा है. यौन उत्पीड़न के बारे में बार-बार बात करना शिकायतकर्ताओं के लिए यातना जैसा है. कई अन्य लड़कियों की तरह मुझे भी बृजभूषण शरण सिंह के कारण सालों तक सबकुछ चुपचाप सहना पड़ा. मेरे पास कोई विकल्प नहीं था. कोई हमें बता सकता है कि बृजभूषण सिंह को क्यों बचाया जा रहा है.
ती पुढे म्हणाली की, जोपर्यंत बृजभूषण सिंह यांना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही जंतर मंतरवरून हटणार नाही. गेले काही महिने माझ्यासाठी तणावपूर्ण गेले आहेत. मात्र महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ही एक प्रदीर्घ लढाई होऊ शकते. तसेच मी कुठलीही कुर्बानी देण्यासाठी तयार आहे.