चुरू (राजस्थान) :भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण देण्याचे जैश-ए-मोहम्मदचे मुख्य केंद्र बॉम्बहल्ल्यांनी उद््ध्वस्त केल्यानंतर, काही तासांतच येथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘देश सुरक्षित हातांत असल्याची’ आणि ‘भारतमातेचे मस्तक कधीही झुकू न देण्याची’ देशवासीयांना ग्वाही दिली.
पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या सर्व सभांमध्ये मोदींनी ‘प्रत्येक अश्रूचा बदला घेतला जाईल’ व ‘तुमच्या मनात संतापाची जी आग पेटली आहे, तीच माझ्याही मनात पेटली आहे,’ असे सांगून देशवासीयांच्या दुखऱ्या मनावर फुंकर घातली होती. पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर झालेल्या या पहिल्यास सभेत नागरिकांच्या आनंदात पंतप्रधान मोदी हेही सामील झाले.
सभेच्या व्यासपीठावर मागील पडद्यावर पुलवामा हल्ल्यातील सीआरपीएफच्या ४० शहीद जवानांची छायाचित्रे लावण्यात आली होती. मोदींनी पहाटे झालेल्या कारवाईचा थेट उल्लेख केला नाही, पण सभेला येतानाच लोकांना त्याची माहिती मिळाल्याने श्रोत्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह स्पष्ट दिसत होता. तीच नस पकडून भाषणाच्या सुरुवातीसच श्रोत्यांना उद्देशून म्हणाले की, आज मला तुमच्या चित्तवृत्ती वेगळ्याच जाणवत आहेत. तुमचा उत्साह मी समजू शकतो. देशाच्या पराक्रमी वीरांना मान झुकवून वंदन करण्याचाच हा क्षण आहे. देशाची सेवा करणाºया, देश उभारणीसाठी परिश्रम घेणाºया प्रत्येकाला देशाचा प्रधानसेवक या नात्याने मी नमन करतो, असेही मोदी म्हणाले.
तत्पूर्वी मी ‘अन्य काही कामात’ व्यग्र असल्याने ‘गांधी शांतता’ पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी येण्यास उशीर झाला, असा हवाई दलाच्या हल्ल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तेथील उपस्थितांसमोर दिलगिरी व्यक्त केली.
हवाई हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानी कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची बैठक घेतली. ती आटोपून मोदी राष्ट्रपती भवन येथील दरबार हॉलमध्ये होणाºया ‘गांधी शांतता’ पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आले. ११ वाजता सुरू होणारा सोहळा त्यामुळे काहीसा उशिरा सुरू झाला. २०१५-२०१८ या कालावधीतील ‘गांधी शांतता’ पुरस्कार या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विजेत्यांना प्रदान करण्यात आले. सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन भारतीय संरक्षण दलाने केलेली मोठी कारवाई म्हणजे हा हवाई हल्ला आहे.२०१४च्या निवडणूक सभेतील कविता ऐकविलीहा देश सुरक्षित हातांत आहे, याची तुम्ही पक्की खात्री बाळगा, असे पंतप्रधान मोदींनी सांगताच, श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट व जयजयकार करून त्यास दुजोरा दिला. याच संदर्भात २०१४च्या निवडणूक प्रचारसभेत म्हटलेली हिंदी कविता पुन्हा म्हणून नरेंद्र मोदी यांनी भारत मातेचे मस्तक कधीही झकू देणार नाही, या वचनाचा पुनरुच्चार केला.
तेरा शीश नहीं झुकने दुंगासौगंध मुझे इस मिट्टी की,मै देश नहीं मिटने दुंगा,मै देश नहीं रुकने दुंगा,मै देश नहीं झुकने दुंगा.मेरा वचन है भारतमां कोतेरा शीश नहीं झुकने दुंगा,जाग रहा है देश मेरा,हर भारतवासी जितेगा.सौगंध मुझे मिट्टी की,मै देश नहीं झुकने दुंगा