शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
2
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
3
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
4
Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा?
5
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
6
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
7
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...
8
रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भाजपा नेता; पोलिसाने लुटली सोन्याची चेन, ४ अंगठ्या, २ मोबाईल
9
पिता-पुत्रांचा षडाष्टक योग: ८ राशींना संमिश्र, अखंड सावध राहावे; सूर्य-शनीची वक्र दृष्टी!
10
रिकाम्या सीटवर बसण्याठी धावला अन् रेल्वेतून खाली पडला; सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू
11
Bajaj Housing Finance Ltd: लिस्टिंगच्या ३ दिवसांत १७०% चा नफा; आता 'हा' शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१५६ वर आला भाव
12
महायुती अन् महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी 'महाशक्ती'; विधानसभेत तिहेरी सामना?
13
Sanjay Roy : "२ दिवसांनी संजय रॉयचे कपडे..."; CBI ने केला पोलिसांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
14
Who is Hasan Mahmud : कोण आहे हसन महमूद? ज्याच्यासमोर टीम इंडियाचे ३ शेर झाले ढेर
15
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेनंतर सरकार १००० कोटींचे 'हे' काम करणार!
16
Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक
17
रेल्वे स्थानकांवरही सुरू होणार एक्झिक्युटिव्ह लाउंज, फक्त दोन रुपयांत मिळू शकते एंट्री!
18
लिस्ट होताच IPO प्राईजच्या खाली आला शेअर; विकण्यासाठी रांग, ₹८२ वर आला भाव, पहिल्याच दिवशी... 
19
दिव्या भारतीच्या निधनाच्या ३१ वर्षांनंतरही कोणतीच अभिनेत्री तोडू शकली नाही तिचा हा रेकॉर्ड
20
Pitru Paksha 2024: पितृ पक्षात मिळणारे शुभ संकेत 'असे' ओळखा आणि भविष्याची आखणी करा!

"मी म्हणालो होतो, दहशतवाद्यांना सोडू नका"; IC-814 हायजॅकसंदर्भात फारुख अब्दुल्ला यांचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 5:14 PM

...तेव्हा, ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात तीन दहशतवाद्यांना सोडू नये, असे आपण तत्कालीन भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारला म्हणालो होतो, असा दावा फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. यातच आता, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी भाजपवर निशाणा साधला. 25 वर्षांपूर्वी काठमांडू येथून दिल्लीला जाणारे इंडियन एअरलाइन्सचे IC 814 विमान हायजॅक झाले होते. तेव्हा, ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात तीन दहशतवाद्यांना सोडू नये, असे आपण तत्कालीन भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारला म्हणालो होतो, असा दावा फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे.

फारुख अब्दुल्ला यांचा भाजपवर निशाणा - इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीनगरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान भाजपवर निशाणा साधताना नॅशनल कॉन्फ्रन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला म्हणाले, "त्या अपहरण प्रकरणात तत्कालीन भाजप सरकारने तीन दहशतवाद्यांना सोडले होते. त्याचा परिणाम आपण पाहतच आहात. दहशतवादी कारवाया होत आहेत. तेव्हा, असे करू नका, असे मी भाजप सरकारला सांगत होतो. त्यांनी माझे एकले नाही. वारंवार चुका करूनही ते देश मजबू करतील, असे त्यांना वाटते."

दहशतवाद संपवण्यात केंद्र सरकार अयशस्वी -याशिवाय, कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरवर संपूर्ण नियंत्रण असूनही दहशतवादावर नियंत्रण मिळविण्यास केंद्र सरकारला अपयशी ठरले आहे, असेही फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण -24 डिसेंबर 1999 रोजी काठमांडू येथून दिल्लाला जाणाऱ्या विमानाचे उड्डाणानंतर एका तासाच्या आत अपहरण करण्यात आले होते. यानंतर अपहरणकर्त्यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारने मौलाना मसूद अजहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जरगर या तीन दहशतवाद्यांची सुटका केली होती. हे सर्व हाय-प्रोफाइल दहशतवादी होते. त्या घटनेच्या वेळी फारुख अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाElectionनिवडणूक 2024