शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
4
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
5
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
6
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
7
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
8
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
9
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
10
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
11
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
12
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
13
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
14
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
15
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
16
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
17
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
18
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
19
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
20
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!

'जीवनाचे सत्य जाणून घेण्यासाठी घर सोडले', संन्यासी बनलेल्या IIT इंजीनिअरची कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:53 IST

Abhay Singh Viral Baba Maha Kumbh  2025 : प्रयागराज येथील कुंभमेळ्यात आलेल्या अभय सिंह यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Abhay Singh Viral Baba Maha Kumbh  2025 : कधी समाजाने वेड्यात काढले, तर कधी घरच्यांनीही वेडा ठरवले. ही गोष्ट आहे IIT मुंबईमधून एअरनॉटिकल इंजीनिअरींग करणाऱ्या अभय सिंह यांची. मूळ हरियाणाच्या हिस्सारचा रहिवासी असलेले अभय सिंह सध्या कुंभमेळ्यात बाबा झालेत. अभयला जीवनाचे सत्य जाणून घेण्याची उत्कट इच्छा होती, म्हणूनच त्यांनी भक्तीच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला.

काशीतील जुना आखाड्याच्या संतांनी अभयला कुंभमेळ्यात आणले. एका हिंदी वृत्तवाहिनीने सर्वात आधी अभयची मुलाखत घेतली, त्यानंतर सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. IIT सारख्या संस्थेत अनेकांना अॅडमिशन मिळत नाही. अशा संस्थेतून शिक्षण घेतलेल्या अभयने हा मार्ग निवडल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आयुष्यात अनेक गोष्टी केल्या, पण सत्याचा शोध लागला नाही. याच सत्याच्या शोधात भक्तीमार्ग निवडल्याचे अभय सांगतात. 

'मी सधू-संत नाही...'आयुष्यात पैसा अन् भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्यांसाठी अभय सिंहची कहानी प्रेरणादायी ठरू शकेल. हिंदी वृत्तवाहिनीशो बोलताना अभय सांगतात की, ते कुंभमेळ्यात फक्त शिकण्यासाठी आणि नवीन अनुभव घेण्यासाठी आले आहेत. ते कुठल्याही पंथाशी, आखाड्याशी संबंधित नाहीत. त्यांनी कोणत्याही महाराजांकडून दीक्षाही घेतलेली नाही. मी साधू-संत नाही, मला फक्त आयुष्याचे सत्य जाणून घ्यायचे आहे, म्हणून इथे आलोय, असं अभय सांगतात. 

कधीकाळी डिप्रेशनमध्ये गेलेअभयने सांगितले की, आयआयटी मुंबईमध्ये गेल्यानंतर त्याला आपल्या आयुष्याची काळजी वाटू लागली. कोणत्याही प्रवासाची सुरुवात प्रश्नांनी होते, माझ्याही मनात अनेक प्रश्न होते. आयुष्यात नेमकं काय हवंय, हा प्रश्न मला पडला होता. मला आयुष्यभर करता येईल, मनाला सुख देईल, अशी गोष्ट शोधायची होती. IIT नंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. झोप येत नव्हती, रात्रभर मनात प्रश्नांचे वादळ उठायचे...मग मला वाटले की, माझी अशी अवस्था का झालीये? मला झोप येत नाहीये, कुठेच मन लागत नाहीये...त्यानंतर मी मानसशास्त्राचा अभ्यास केला. पुढे इस्कॉनकडे वळलो अन् श्रीकृष्णाबद्दल वाचण सुरू केले.

लोकांनी वेड्यात काढले...हळुहळू मी अध्यात्माकडे वळालो, ध्यान करू लागलो, मला आयुष्याचा अर्थ समजू लागला. तेव्हा अनेकांनी मला वेड्यात काढले. घरच्यांनीही मला वेडा समजले. त्यांचे विचार वेगळे होते, माझे विचार वेगळे होते. मला कुठेच अडकायचे नव्हते, म्हणून मी घर सोडले अन् देशभर प्रवास केला. पायी चारधाम यात्रा केल्या, अनेक पवित्र स्थळांना भेटी दिल्या अन्  शेवटी काशी गाठली. काशीला येऊन बाबा सोमेश्वर पुरींना भेटलो अन् त्यांनीच पुढे आध्यात्माचा मार्ग दाखवला. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशIIT Mumbaiआयआयटी मुंबई