ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी खोटी साक्ष देण्यासाठी युपीए सरकारनं माझ्यावर दबाव टाकला होता, मला बड्या नोकरीची आमिषं दाखवण्यात आली होती, परंतु त्याला मी बधलो नाही असा खळबळजनक आरोप इंचेलिजन्स ब्युरोचे माजी विशेष संचालक राजिंदर कुमार यांनी केला आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार 'माझ्यावर दबाव टाकला, मला आमिषं दाखवली, इंटेलिजन्स ब्युरोला बदनाम करण्याची कारस्थानं रचली गेली तसेच युपीए सरकारपुढे आव्हान म्हणून उभ्या ठाकलेल्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी इशरत जहाँ प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला' असा खळबळजनक आरोप राजिंदर कुमार यांनी केला आहे.
इशरत जहाँ लष्करची दहशतवादी होती या हेडलीच्या जबानीनंतर आता हे प्रकरण अत्यंत गंभीर वळण घेत असून यामध्ये आधीच्या युपीए सरकारवर अनेक आरोप होताना दिसत आहेत.