अयोध्या - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यांनतर आयोजित पत्रकार परिषदेत मोदी सरकारला खडे सवाल केले. तसेच मी राम मंदिर जन्मभूमीच्या पवित्र जागी गेलो. तिथं दर्शन घेतलं, मला रोमांचित अनुभव आला. त्या जागेत काहीतरी अद्भूत शक्ती आहे, तेज आहे, चेतना आहे, असे म्हणत राम मंदिराबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. मी मंदिरात जातोय की तुरुंगात हेच मला कळत नसल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंनी राम जन्मभूमीचे दर्शन घेतल्यानंतर मला रोमांचित अनुभव आल्याचं सांगत राम मंदिर कधी उभारणार असा सवाल मोदी सरकारला केला. राम मंदिर सरकार नाही तर कोण बांधणार, असेही ते म्हणाले. तसेच मोदी सरकारवर टीका करताना जर, सरकारने मंदिर नाही बनवले, तर सरकारही राहणार नाही, अशा शब्दात मोदी सरकारला इशारा दिला आहे.
* उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
हिंदू मार खाणार नाही, आता हिंदू प्रश्न विचारणार, मंदिर कधी बनणार
रामलल्लाच्या दर्शनासाठी मंदिरात जातोय की तुरुंगात जातोय हेच कळत नव्हतं याच दुख वाटत होतं
जर राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच घ्यायचाय तर निवडणुकीत या मुद्द्याचा वापर करू नका
मंदिर बनलं नाही तर सरकारही बनणार नाही.
समस्त हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन अयोध्या दौरा
राम मंदिरासाठी अध्यादेश काढा
अयोध्येत येण्यामागे कोणताही छुपा अजेंडा नाही: उद्धव ठाकरे
सहकार्य केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेश सरकार, पोलीस प्रशासन आणि अयोध्यावासियांचे आभार