शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

VIDEO: तुझी मान कापून टाकेन; हाती कुऱ्हाड घेत मुख्यमंत्र्यांची भाजपा नेत्याला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 2:48 PM

मुख्यमंत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

चंदिगढ: जनआशीर्वाद यात्रेदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर वादात सापडले आहेत. खट्टर यांचा स्पक्षीय नेत्याला धमकी देत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हातात कुऱ्हाड घेतलेले खट्टर स्वपक्षीय नेत्याला धमकी देताना दिसत आहेत. यामुळे खट्टर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ खट्टर यांच्या जनआशीर्वाद यात्रेतील आहे. यात खट्टर एका वाहनावर उभे राहिलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात एक कुऱ्हाड आहे. कुऱ्हाड शत्रूचा नाश करण्यासाठी असते, असं म्हणत खट्टर उपस्थितांशी संवाद साधत आहेत. याचवेळी खट्टर यांच्या मागे असलेल्या एका भाजपा नेत्यानं खट्टर यांना पारंपारिक टोपी घालण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र खट्टर यांना ही गोष्ट न आवडल्यानं ते संतापतात आणि स्वपक्षीय नेत्याला मान कापण्याची धमकी देतात.  व्हायरल व्हिडीओत संतप्त झालेले खट्टर दिसत आहेत. भाजपा नेत्यानं टोपी घालण्याचा प्रयत्न करताच खट्टर त्यांना 'हे काय करत आहात? मान कापून टाकेन तुझी. एका बाजूला जा,' असं म्हणत धमकी देतात. यानंतर भाजपा नेता खट्टर यांची माफी मागतो.  यावरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी खट्टर यांच्यावर निशाणा साधला आहे. 'राग आणि अहंकार आरोग्यासाठी हानीकारक असतो. खट्टर साहेबांना राग का येतो? कुऱ्हाड घेऊन त्यांच्याच नेत्याला म्हणतात, मान कापून टाकेन. मग जनतेसोबत काय करतील?', अशा शब्दांमध्ये सुरजेवालांनी खट्टर यांना लक्ष्य केलं.

टॅग्स :BJPभाजपा