शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 18:58 IST

Lok Sabha Election 2024 : पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील उलुबेरिया येथे शुक्रवारी धमकीचे पोस्टर सापडले आहेत.

हावडा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे, पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील उलुबेरिया येथे शुक्रवारी धमकीचे पोस्टर सापडले आहेत. पांढऱ्या कापडाच्या तुकड्यावर हिरव्या शाईने हाताने लिहिलेले पोस्टर उलुबेरियाच्या फुलेश्वर भागातील एका बांधकामाच्या जागेवरून जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याठिकाणी लोकसभा निवडणुकीसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना गाडीने धडक देऊन ठार करीन. यानंतर सर्वजण दिवे लावतील. माझ्याकडे एक गुप्त पत्र आहे, असे असे बंगाली भाषेत पोस्टरवर लिहिलेले आहे. दरम्यान, विटांच्या ढिगाऱ्यावर पोस्टर लटकलेले आढळले. पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्त पत्राचा अर्थ काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा एक खोडसळपणा असू शकतो. यात कोणी एक व्यक्ती किंवा गट सहभागी होता का, याचा शोध घ्यावा लागेल.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी नरेंद्र मोदी सरकार आदिवासींचे हक्क हिरावून घेण्याचा आणि विविध मागासलेल्या समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा कट रचल्याचा आरोप केला. टीएमसीचे झारग्राम लोकसभा उमेदवार कालीपदा सोरेन यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. भाजपाचे उद्दिष्ट एनआरसी लागू करून आदिवासींना उखडून टाकणे आहे आणि शेवटी त्यांना त्यांच्या जमिनीच्या हक्कापासून वंचित ठेवणे आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

१८ जागांवर मतदान पार पडलंय!पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण ४२ जागा आहेत. त्यापैकी १८ जागांवर चार टप्प्यात मतदान झाले आहे, तर २४ जागांवर तीन टप्प्यात मतदान होणे बाकी आहे. तीन टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. टीएमसी, भाजपा, माकप आणि काँग्रेस निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४jhargram-pcझारग्राम