नवी दिल्लीः भाजपा नेत्या आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, अशी त्यांनी घोषणा केली आहे. इंदूरमधल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तसेच माझ्या या निर्णयाची कल्पना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघाचं त्या प्रतिनिधित्व करतात. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. परंतु भाजपा त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. प्रकृती ठीक नसल्यानं त्यांना वारंवार रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागतात, अशातच कामाचा त्यांच्यावर ताण पडतो. त्यामुळे त्यांनी लोकसभा न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सध्या त्या मध्य प्रदेशात असून, भाजपाचा प्रचार करत आहेत.
मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही- सुषमा स्वराज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 3:18 PM