शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

लडाख सीमेवर चिनी हवाई दलाची हालचाल; फॉरवर्ड एअरबेसेसवर लढाऊ विमानं तैनात - IAF

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 12:38 PM

ज्या ठिकानांवरून दोन्ही देशांची भूमिका भिन्न आहे. अशा जागेवर चीनने मागे हटावे, असे भारताने स्पष्ट केले आहे. एप्रिलपूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती भारताला हवी आहे.

ठळक मुद्देलडाखमध्ये भारत-चीन सीमेलग चिनी हवाईदलाची हालचाल वाढल्याचे दिसून आले आहे.भारतीय हवाई दलानेही आपल्या फॉरवर्ड बेसेसवर लढाऊ विमानं तैनात केली आहेत.चीनसोबत युद्ध नाही, पण कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायला तयार - भदौरिया

हैदराबाद :लडाखमध्येभारत-चीन सीमेलग चिनी हवाईदलाची हालचाल वाढल्याचे दिसून आले आहे. यानंतर, भारतीय हवाई दलानेही आपल्या फॉरवर्ड बेसेसवर लढाऊ विमानं तैनात केली आहेत. आयएएफ प्रमुख एअर चिफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी शनिवारी ही माहिती दिली. ते येथील एअरफोर्स अॅकॅडमीच्या कम्‍बाइन्ड ग्रॅज्युएशन डे परेड निमित्त आले होते.

भदौरिया म्हणाले, आयएएफला चिनी एअरबेसेस आणि एलएसीजवळ त्यांच्या एअरक्राफ्ट्सच्या तैनातीसंदर्भात माहिती आहे. गर्मीच्या दिवसांत नॉर्मल अभ्‍यास सुरू असतो. मात्र, यावेळी आम्हाला नेहमीपेक्षा अधिक विमानांची तैनाती दिसून आली आहे. आपण आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत."

PHOTO : 'या' महत्वाच्या भागावर चीनने केलाय कब्जा, आहे वादाचा सर्वात मोठा मुद्दा

चीनसोबत युद्ध नाही, पण कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायला तयार -भदौरिया यांना विचारण्यात आले, चीनबरोबर युद्ध होईल की नाही? यावर ते म्हणाले, "नाही, आपले चीनबरोबर युद्ध सुरू नाही. मात्र, आपण कुठल्याही परिस्थितीचा सामना करायला तयार आहोत. एलएसीवरील तणाव शांततेच्या मार्गाने सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. तसेच गलवानमध्ये आपल्या वीर जवानांनी दिलेले बलिदान आम्ही व्‍यर्थ जाऊ देणार नाही,' असेही भदोरिया यांनी म्हटले आहे.

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

लष्कराला सर्व माहीत, पेट्रोलिंग वाढली -एअर चीफ मार्शल म्हणाले, विश्वास ठेवा, आपले सैनिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत. काय झाले, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. शत्रूला कसल्याही प्रकारचा संदेश देण्याची आमची इच्छा नाही. कारण त्यांना आपल्या क्षमतांचा पूर्ण अंदाज आहे. तसेच लडाखमध्ये पेट्रोलिंग वाढवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

थेट युनिट्समध्ये जातील अधिकारी -येथून तट रक्षक दल, नौ दल आणि व्हिएतनामच्या सेनिकांनीही ग्रॅज्युएशन पूर्ण केले. व्हिएतनाम एअरफोर्सच्या दोन जवानांनी येथून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. नव्या 123 अधिकाऱ्यांशी संवाद साधताना आयएएफ चीफ भदौरिया म्हणाले, हे अधिकारी सरळ आपल्या यूनिट्समध्ये जातील. कुठल्याही प्रकारचा ब्रेक मिळणार नाही. "आपल्या भागातील सध्यस्थिती पाहता, आपल्या जवानांनी कुठल्याही वेळी तयार राहायला हवे, असेही ते म्हणाले.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

अशी आहे भारताची मागणी -ज्या ठिकानांवरून दोन्ही देशांची भूमिका भिन्न आहे. अशा जागेवर चीनने मागे हटावे, असे भारताने स्पष्ट केले आहे. एप्रिलपूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती भारताला हवी आहे. यासाठी चीनला पेंगाँग त्सोमधील आपले अनेक स्‍ट्रक्‍चर्स आणि बंकर्स नष्ट करावे लागतील. याला वेळ लागू शकतो.

India and china standoff : भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा!

 

टॅग्स :border disputeसीमा वादIndiaभारतchinaचीनBorderसीमारेषाladakhलडाखindian air forceभारतीय हवाई दल