हरियाणातील पंचकुला येथे भारतीय हवाई दलाचे जग्वार हे लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात पायलट थोडक्यात बचावला आहे. यासंदर्भात हवाई दलाने दिलेल्या निवेदनानुसार, लढाऊ विमानाने अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. पंचकुलाच्या डोंगराळ भागात असलेल्या मोरनी येथील बालदवाला गावाजवळ हे विमान कोसळले.
या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण आहे. महत्वाचे म्हणजे, लढाऊ विमानाचा पायलट पॅराशूटच्या सहाय्याने सुरक्षितपणे उतरवण्यात यशस्वी झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.