लखनौ - काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा, गेस्ट हाऊसमधील झाडू मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून खळबळ उडाली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधिकार्यांनी गेस्ट हाऊसमध्ये प्रियांकांना कुठल्या परिस्थितीत आणि कुणी झाडू उपलब्ध करून दिला, याची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, प्रियांका यांना येथे आणण्यापूर्वीच या एसी रूममध्ये पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली होती. एवढेच नाही, तर व्हीव्हीआयपी प्रोटोकॉल पूर्ण केला असतानाही रूममध्ये धूळ कुठन आली, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. तसेच, प्रियांका यांचा झाडू मारतानाचा व्हिडिओ त्यांच्या PSO ने तयार केल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (Iakhimpur Kheri from where dust came in Priyanka Gandhi's room inquiry begins)
लखीमपूरला जाताना ताब्यात घेण्यात आलेल्या प्रियांका गांधी यांना सीतापूरच्या पीएसी परिसरातील एका अतिथीगृहात नेण्यात आले. येथे त्यांचा झाडू मारतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. पीएसीच्या काही अधिकाऱ्यांनी गेस्ट हाऊसमधील कर्मचाऱ्यांची चौकशीही केली आणि एक अहवालही तयार करण्यात आला आहे.
प्रियांका गांधी यांच्या स्टाफनेचे मागितला होता झाडू - सेकंड कॉर्प्स पीएसीचे जनरल यादवेंद्र सिंह यांनी सांगितले की, प्रियांका गांधी यांच्या स्टाफने झाडू मागितला होता. मॅडमला स्वच्छता करायची आहे, असे त्यांनी म्हटले होते. यावर तेथील कर्मचाऱ्याने त्यांना झाडू दिला. यानंतरच हा व्हिडिओ व्हायरल झाला. आतापर्यंतच्या तपासात एवढेच स्पष्ट होऊ शकले आहे. प्रियांका गांधी पोहोचण्यापूर्वीच स्वच्छ करण्यात आली होती रूम - पीएसी परिसरातील या गेस्ट हाऊसमध्ये एकूण चार रूम आहेत. येथे दोन सफाई कामगार स्वच्छतेसाठी तैनात असतात. हे लोक येथे रोजच्या रोज स्वच्छता करतात. येथे एका फॉलोअरशिवाय स्वच्छता व्यवस्थेचे मॉनिटरिंग करण्यासाठीही दीवान तैनात आहे. या रूम खाली असल्या तरी येथे रोज झाडू-पोचा केला जातो. ज्या रूममध्ये प्रियांका गांधी यांना थांबवण्यात आले होते, ती रूम त्या पोहचण्यापूर्वीच स्वच्छ करण्यात आली होती. तसेच रोजच्या रोज मुख्य गेटपासून ते आतपर्यंत स्वच्छता केली जाते, असेही कमांडरने म्हटले आहे