शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
4
LIC नं Tata Group मधील 'या' कंपनीतील हिस्सा विकला, शेअर जोरदार आपटला
5
Maharashtra Election 2024 Live Updates: राज ठाकरे यांची आज वरळीत दुसरी जाहीर सभा, कोणावर साधणार निशाणा?
6
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
7
सलमान खानला पाठवले धमकीचे मेसेज! पोलिसांनी युवा गीतकाराला ठोकल्या बेड्या; समोर आलं मोठं कारण
8
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
9
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
10
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
11
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
12
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
13
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
14
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
15
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
16
मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
17
महागडी फी भरून शाळेत काय मिळते? - निराशा!
18
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
19
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!

देशातील सर्वात श्रीमंत IAS अधिकारी, पगार फक्त 1 रुपये; कोण आहेत अमित कटारिया? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 4:43 PM

IAS Amit Kataria : अमित कटारिया यांनी UPSC परीक्षेत देशातून 18वा क्रमांक मिळवला होता.

IAS Amit Kataria : देशात अनेक IAS-IPS अधिकारी आहेत, जे नेहमी चर्चेत असतात. आम्ही तुम्हाला एका अशा IAS अधिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत, ज्यांची गणना देशातील सर्वात श्रीमंत IAS अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. विशेष बाब म्हणजे, ते महिन्याला फक्त 1 रुपये पगार घेतात. अमित कटारिया, असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांची संपत्ती कोटींमध्ये आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, 1 रुपया पगार घेणारा अधिकारी श्रीमंत कसा? 

कोण आहेत IAS अमित कटारिया? IAS अमित कटारिया हरियाणातील गुरुग्रामचे रहिवासी असून, सध्या त्यांची पोस्टिंग छत्तीसगडमध्ये आहे. सुमारे 7 वर्षांच्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवरुन ते परतले आहेत. त्यांची गणना देशातील सर्वात श्रीमंत अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. अमित कटारिया अनेकवेळा चर्चेत आले आहेत. पीएम मोदींसोबतची भेट असो किंव फक्त 1 रुपये पगार घेणे असो. कटारियांची नेहमी चर्चा असते. नुकतीच त्यांची पोस्टिंग पुन्हा छत्तीसगडला करण्यात आली आहे.

कोट्यवधी रुपयांची संपत्तीअमित कटारिया हे व्यापारी कुटुंबातील असून त्यांच्या कुटुंबाचा मोठा रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसाय आहे. त्यांचा व्यवसाय दिल्ली आणि आसपासच्या भागात पसरलेला आहे. हा व्यवसाय त्यांचे कुटुंबीय चालवतात. या व्यवसायातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळते. एका रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 2021 नुसार त्यांच्या पदावरील मूळ वेतन 56000 रुपये आणि इतर भत्त्यांसह 1.40 लाख रुपयांपेक्षा जास्त होते. पण, अमित कटारिया सरकारककडून फक्त 1 रुपये पगार घेतात. अमित यांनी पत्नी अस्मिता हांडा एक व्यावसायिक पायलट असून, त्यांचा पगारही लाखात आहे.

2003 साली UPSC उत्तीर्णअमित कटारिया यांनी IIT दिल्लीतून बीटेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2003 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी UPSC मध्ये देशातून 18 वा क्रमांक मिळवला होता.  अमित कटारिया बस्तरचे जिल्हाधिकारी असताना प्रसिद्धीच्या झोतात आले होते. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बस्तर दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान मोदींना भेटताना गडद चष्मा घातला होता, जो सरकारी प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. यामुळे अमित कटारिया यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तसेच, पुढे त्यांना बस्तरमधून केंद्रीय प्रतिनियुक्तीवर दिल्लीला बोलावण्यात आले होते.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगEducationशिक्षणInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी