UPSC परीक्षा उत्तीर्ण करणं हे सोपं नाही कारण ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत आणि संयम लागतो. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. IAS अधिकारी अंजू शर्मा या बारावीमध्ये काही विषयात नापास झाल्या होत्या. पण आता वयाच्या 22 व्या वर्षी UPSC ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि यश मिळवले. अंजू यांनी अपयशाचे यशात रूपांतर केले.
अंजू शर्मा 12वीच्या इकोनॉमिक्स पेपरमध्ये नापास झाल्या होत्या आणि 10वीमध्ये प्री-बोर्ड केमिस्ट्रीमध्येही नापास झाल्या होत्या. मात्र, इतर विषयांत त्या डिस्टिंक्शनने पास झाल्या. यशासाठी कायम तयार राहा असं त्यांनी म्हटलं आहे. त्याच्या आयुष्यातील दोन घटनांनीच त्याचे भविष्य घडवले, असं त्या म्हणतात. अंजू यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, "माझ्या प्री-बोर्ड दरम्यान, माझ्याकडे अनेक चॅप्टर कव्हर करायचे होते आणि रात्रीच्या जेवणानंतर मी घाबरू लागले कारण मी तयार नव्हते आणि मला माहीत होते की मी अयशस्वी होणार आहे."
"माझ्या आजूबाजूचे प्रत्येक जण 10वी इयत्तेतील कामगिरी किती महत्त्वाची आहे यावर जोर देत होते. या कठीण काळात त्याच्या आईने समजून घेतले आणि प्रोत्साहन दिले. शेवटच्या क्षणी अभ्यासावर अवलंबून राहू नये हा धडाही शिकविला. त्यामुळे त्याने अगदी सुरुवातीपासूनच कॉलेजच्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली आणि कॉलेजमध्ये गोल्ड मेडलिस्ट होण्यास मदत झाली. जयपूरमधून बीएससी आणि एमबीए पूर्ण केले."
अंजू शर्मा यांनी या स्ट्रेटर्जीमुळे पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत झाली. त्यांनी आपला अभ्यासक्रम आधीच पूर्ण केला आणि आयएएस टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवले. अंजूने 1991 मध्ये राजकोटच्या असिस्टंट कलेक्टर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी भारत सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयात विविध पदांवर काम केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"