कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर काहीतरी करण्याची जिद्द आणि उत्साह असणं आवश्यक आहे. आयएएस अधिकारी अंशुमन राज यांच्यातही तेच गुण आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अंशुमन राज यांनी दिव्याच्या प्रकाशात शिक्षण घेतलं. तसेच कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC परीक्षा देऊन IAS झाले आहेत. त्यांची यशोगाथा जाणून घेऊया...
IAS अधिकारी अंशुमन राज यांचा जन्म बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात झाला. गावातीलच जवाहर नवोदय विद्यालयातून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. दहावीपर्यंत दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला. यानंतरचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय रांची येथून केले.
अंशुमन राज यांनी इंटरमीडिएटनंतर इंजिनीअरिंगची पदवी घेतली. पण त्यांना नेहमीच यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस व्हायचे होते. शालेय जीवनापासूनच ते याबाबत स्पष्ट होते. म्हणूनच ग्रॅज्युएशननंतर ते यूपीएससीच्या तयारीत पूर्णपणे गुंतले होते..
अंशुमन यांनी यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी कोणतेही कोचिंग घेतले नाही. असे असूनही, त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयआरएस झाले. पण आयआरएस मिळाल्याने ते समाधानी नव्हते. त्यांनी आयएएसपेक्षा कमी काही स्वीकारले नाही. मात्र, यानंतर त्यांना पुन्हा यशासाठी अनेक अपयशांना सामोरे जावे लागले.
अंशुमन राज पहिल्याच प्रयत्नात आयआरएस झाले. मात्र त्यानंतर त्यांना सलग दोनदा अपयश आले. अखेर चौथ्या प्रयत्नात म्हणजेच 2019 मध्ये पुन्हा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यात ते यशस्वी झाले. यावेळी ते ऑल इंडिया 107 वी रँक मिळवून आयएएस होण्यात यशस्वी झाले.
UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी गावात राहूनही करता येते, असा विश्वास आयएएस अंशुमन राज यांना वाटतो. यासाठी फक्त चांगल्या इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. यासोबतच योग्य रणनीती आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचीही गरज आहे. त्यांचा विश्वास आहे की मर्यादित संसाधने असूनही, योग्य प्रकारे तयारी केल्यास, एखादी व्यक्ती यूपीएससी उत्तीर्ण करू शकते आणि आयएएस होऊ शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.