आयएएस अधिकारी टीना डाबी आणि अतहर अमिर खान या दोघांच्या जोडीने घटस्फोटानंतर आपापले जिवनसाथी निवडले आहेत. टीना यांनी आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्याशी काही महिन्यांपूर्वीच लग्न केले, तर अतहर यांचेही आज लग्न झाले आहे.
अतहर खान यांनी दोन महिन्यांपूर्वी डॉ. महरीन काझी हिच्याशी साखरपूडा केला होता. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला आहे. यामध्ये अतहर एका काँट्रॅक्टवर सही करताना दिसत आहेत. त्यांचा साखरपूडा जुलैमध्ये झाला होता. आयएएस अतहर त्याची होणारी पत्नी मेहरीनसोबत सोफ्यावर बसला आहे. एक मुलगी त्यांच्यासमोर 'एंगेजमेंट कॉन्ट्रॅक्ट' ठेवते. हे पाहून अतहरने खरोखरच सही करायची आहे का, असा सवाल केला. यावेळी उपस्थित लोक हसले.
काय आहेत या अटी...१- अतहरला प्रत्येक वेळी मेहरीनच बरोबर असल्याचे मान्य करावे लागेल.2- वर्षातून 2-3 वेळा मेहरीनला परदेशात फिरण्यासाठी घेऊन जावे लागेल.3- महरीन जे काही मागेल, ते कुठेही असले तरी ते खरेदी करून द्यावे लागेल.
UPSC चा 2015 दुसरा टॉपर आणि IAS अतहर आमिर खान यांचे आज दुसरे लग्न झाले. टीना डाबी यांच्याशी त्यांचे पहिले लग्न झाले होते. लग्नाच्या फोटोग्राफरने याला दुजोरा दिला आहे. हा विवाह श्रीनगरमध्ये होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 30 सप्टेंबरला मेहंदी सोहळा पार पडला. आयएएस अतहरच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मेहरीन मेहंदी लावताना दिसत आहे. त्यांच्या लग्नाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. युजर्स त्यांच्या लग्नाबद्दल त्यांना शुभेच्छा देत आहेत.