प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. UPSC 2016 उत्तीर्ण केलेले राजस्थान केडरचे IAS अधिकारी देव चौधरी हे सीमावर्ती जिल्ह्यातील बारमेरचे रहिवासी आहेत. देव यांनी चौथ्या प्रयत्नात हे यश मिळवलं होतं. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावच्या शाळेतच झाले.
देव चौधरी यांनी बाडमेर महाविद्यालयातूनच बीएसी केले. त्यांनी लहान वयातच आयएएस होण्याचा निर्णय घेतला होता. पदवीनंतर लगेचच त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. देव चौधरी यांनी 2012 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात प्रिलिम्स क्रॅक केली पण मेन्स पास होऊ शकले नाहीत. देवने 2012 मध्ये पुढचा प्रयत्न केला. यावेळी त्याने प्रिलिम्ससह मेन क्लीअर केले. मात्र मुलाखतीच्या फेरीत ते बाद झाले.
देव यांनी हिंमत हारली नाही, ते खचले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससीची परीक्षा दिली. पण यावेळीही ते आयएएस होऊ शकले नाहीत. देव चौधरी यांनी चौथ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. देव कुमार हे हिंदी माध्यमाचे विद्यार्थी आहेत. यूपीएससीच्या तयारीदरम्यान मला हिंदीतील स्टडी मटेरियल शोधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. तसेच इंग्रजीही नीट शिकावं लागलं.
देव यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, त्यांचे वडील सुजनराम हे शिक्षक होते. यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला नाही. पण वारंवार आलेल्या अपयशाने नक्कीच निराशा केली. मात्र, वडील आणि मित्रांनी त्याला धीर सोडू नकोस असा सल्ला दिला. देव चौधरी तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होते. देव यांनी दिल्लीत राहून यूपीएससीची तयारी केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.