IAS success story: महिला IAS आमदाराच्या 'प्रेमात', जाणून घ्या दिव्या एस अय्यर यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी' 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 07:56 PM2023-02-15T19:56:23+5:302023-02-15T19:57:04+5:30

IAS Divya S Lyer and KS Sabarinathan: IAS आणि IPS हे ऐकमेकांच्या प्रेमात पडलेल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात.  

IAS Divya S Iyer marries MLA KS Sabarinathan, know their love story   | IAS success story: महिला IAS आमदाराच्या 'प्रेमात', जाणून घ्या दिव्या एस अय्यर यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी' 

IAS success story: महिला IAS आमदाराच्या 'प्रेमात', जाणून घ्या दिव्या एस अय्यर यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी' 

Next

IAS Divya S Iyer Love Story । नवी दिल्ली : IAS आणि IPS हे ऐकमेकांच्या प्रेमात पडलेल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात. पण एक IAS अधिकारी अशा देखील आहेत, ज्यांनी आपले हृदय कोणत्याही IAS किंवा IPS ला दिले नसून आमदाराला दिले आणि त्याच्याशी विवाह केला. खरं तर ही कहाणी केरळ कॅडरच्या IAS दिव्या एस अय्यर आणि काँग्रेस आमदार केएस सबरीनाथन यांची आहे. 2007 या कालखंडात या दोघांची पहिली भेट झाली होती. त्यावेळी दोघेही सोशल मीडियावर सक्रिय नव्हते. तरीही त्यांनी एकमेकांशी संपर्क ठेवला आणि प्रेमकहाणी यशस्वी केली.

अशी झाली सुरूवात 
आमदार केएस सबरीनाधन आणि आयएएस दिव्या एस अय्यर यांची प्रेमकहाणी तिरुवनंतपुरममध्ये सुरू होते. जिथे ते पहिल्यांदाच भेटले होते. ही गोष्ट तेव्हा उघडकीस आली जेव्हा के.एस. सबरीनाथन यांनी 2007 मध्ये फेसबुकवरील रिलेशनशिप स्टेटस बदलले. यासोबतच त्यांनी लिहिले की, " जेव्हा आम्ही थोडे जवळ आलो तेव्हा आपल्याला वाटू लागले की जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन, विचार आणि आवडी-निवडी खूप समान आहेत. त्यामुळेच आम्ही घरच्यांच्या आशीर्वादाने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे." 

कोण आहेत IAS दिव्या एस अय्यर
IAS दिव्या एस अय्यर या केरळ केडरच्या अधिकारी आहेत. IAS अधिकारी होण्यापूर्वी त्या एमबीबीएसचे शिक्षण घेत होत्या. त्यांचे वडील इस्रोमध्ये अधिकारी होते. IAS दिव्या यांना शास्त्रीय संगीताची आवड आहे. त्या 2014 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांचा फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्या आपल्या मुलाला आपल्या मांडीवर ठेवून कार्यक्रमाला संबोधित करत होत्या.

कोण आहेत केएस सबरीनाथन 
केएस सबरीनाथन हे विधानसभेचे अध्यक्ष आणि दिवंगत काँग्रेस नेते जी कार्तिकेयन यांचे पुत्र आहेत. 2015 मध्ये ते आमदार झाले होते. त्यावेळी त्यांचे वय 31 वर्षे होते. त्यावेळी सर्वात तरुण आमदार होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. ते सध्या युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते पदवीधर असून राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी बंगळुरूमध्ये काम केले आहे. 2015 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले आणि पोटनिवडणूक जिंकली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 


 

Web Title: IAS Divya S Iyer marries MLA KS Sabarinathan, know their love story  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.