शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

IAS-MLA Love Story : आयएएस आणि आमदार पडले प्रेमात, पहिल्याच भेटीत झाली होती सुरुवात; खास आहे संपूर्ण लव्ह स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 3:04 PM

IAS Divya S Iyer Love Story: IAS दिव्या एस अय्यर आणि MLA केएस सबरीनाथन यांची लव्ह स्टोरी तिरुवनंतपुरममध्ये झालेल्या एका भेटीनंतर सुरू झाली...

आयएएस-आयपीएस, आयएएस-आयएएस अथवा आयएएस-आयएफएस अशा लव्ह स्टोरी तर आपण अनेवेळा वाचल्या असतील. पण येथे आम्ही ज्या लव्ह स्टोरीसंदर्भात बोलत आहोत ती लव्ह स्टोरी काहीशी अनोखी आहे. आम्ही एका आयएएस आणि एमएलए अर्थात आमदार यांच्या लव्ह स्टोरीसंदर्भात बोलत आहोत. ही लव्ह स्टोरी आहे केरळ कॅडरच्या आयएएस दिव्या एस अय्यर आणि काँग्रेसचे आमदार केएस सबरीनाथन यांची.

सर्वात पहिले जाणून घेऊयात आमदारासंदर्भात. आमदार केएस सबरीनाथन दिवंगत काँग्रेस नेते तथा विधानसभा अध्यक्ष जी कार्तिकेयन यांचे पुत्र आहेत. केएस सबरीनाथन 2015 मध्ये आमदार झाले होते. तेव्हा ते केवळ 31 वर्षांचे होते. एवढेच नाही, तर ते केरळचे सर्वात कमी वयाचे आमदार बनले होते. केएस सबरीनाथन आता  यूथ काँग्रेसचे स्टेट व्हाईस प्रेसिडेंट आहेत.

सबरीनाथन यांच्या शिक्षणासंदर्भात बोलायचे झाल्यास, त्यांनी मॅनेजमेंट मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे आणि राजकारणात येण्यापूर्वी बेंगळुरूमध्ये काम करत होते. 2015 मध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर ते पॉलिटिक्समध्ये आले आणि पोटनिवडणुकीत विडलांच्या जागेवर निवडणूक जिंकली.

आता जाणून घेऊयात आयएएस दिव्या एस अय्यर यांच्यासंदर्भात. दिव्या केरळ कॅडरच्या अधिकारी आहेत. आयएएस अधिकारी होण्यापूर्वी दिव्या यांनी एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. दिव्या यांचे वडील इस्रोमध्ये अधिकारी होते. दिव्या यांना शास्त्रीय संगिताची आड आहे. त्या 2014 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. त्यांचे डान्स व्हिडिओदेखील सातत्याने व्हायरल होत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. यात त्या आपल्या मुलाला कडेवर घेऊन एका प्रोग्रॅममध्ये भाषण करत होत्या. 

अशी फुलली लव्ह स्टोरी - IAS दिव्या एस अय्यर आणि MLA केएस सबरीनाथन यांची लव्ह स्टोरी तिरुवनंतपुरममध्ये झालेल्या एका भेटीनंतर सुरू झाली. खरे तर केएस सबरीनाथन यांनी 2007 मध्ये फेसबुकवरील आपेल रिलेशनशिप स्टेटस बदलून 'कमिटेड' असे केले होते. यावेळी त्यांनी हे सर्व कसे घडले हे सांगताना लिहिले होते, "जेव्हा आम्ही थोडे जवळ आलो, तेव्हा आम्हाला जाणवले की, जीवनाबद्दलचे आमचे विचार, दृष्टीकोन आणि आवडी-निवडी जवळपास सारख्याच आहेत. यामुळे आम्ही आमच्या आप्तांच्या आशीर्वादाने लग्न करण्याचा निर्णय घेतला."

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टKeralaकेरळMLAआमदारcollectorजिल्हाधिकारी