शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

वेब सीरिजमध्ये काम केलेले IAS अधिकारी अभिषेक सिंह निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 15:26 IST

अभिषेक सिंह यांना 2022 च्या गुजरात निवडणुकीत निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले होते, परंतु कारसमोर उभे राहून फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यांना काढून टाकण्यात आले.

लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आयएएस अधिकारी अभिषेक सिंह यांना न कळवता सतत रजेवर गेल्याने त्यांना निलंबित केले आहे. 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी अभिषेक सिंह हे नेहमी चर्चेत राहिले आहेत. दरम्यान, अभिषेक सिंह यांना 2014 मध्ये सुद्धा निलंबित करण्यात आले होते. अभिषेक सिंह यांची पत्नी दुर्गा शक्ती नागपाल देखील आयएएस आहे.

अभिषेक सिंह यांना 2022 च्या गुजरात निवडणुकीत निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले होते, परंतु कारसमोर उभे राहून फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यांना काढून टाकण्यात आले. त्यानंतर उत्तर प्रदेशात आल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला नाही. नियुक्ती विभागाने त्यांना नोटीसही पाठवली होती, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. स्पष्टीकरण न देता बेपत्ता आणि आचार नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान,आयएएस अभिषेक सिंह यांनी 2011 मध्ये यूपूएसी (UPSC) परीक्षेत 94 वा क्रमांक मिळविला होता. त्यांना उत्तर प्रदेश कॅडर मिळाले होते. त्यांची पहिली पोस्टिंग कानपूर (ग्रामीण) येथे जॉइंट मॅजिस्ट्रेट म्हणून झाली. आयएएस झाल्यानंतरही अभिषेक सिंहची आवड अभिनय आणि संगीतात कायम राहिली. लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केल्यानंतर ते प्रकाशझोतात आले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर अभिषेक सिंह यांचे 30 लाख फॉलोअर्स आहेत. ते बी प्राकसोबत 'दिल तोड के' गाण्यात दिसून आले होते. याशिवाय त्यांनी जुबिन नौटियालच्या 'तुझे भूलना तो चाहता...' या गाण्यातही काम केले होते. तसेच, नेटफ्लिक्सवरील सिरिजमध्येही ते दिसून आले होते.

योगी सरकारच्या कार्यकाळात 'या' आयएएस अधिकाऱ्यांचे निलंबित- जितेंद्र बहादूर सिंह यांना जून 2018 मध्ये डीएम गोंडा या पदावर असताना निलंबित करण्यात आले होते.- कुमार प्रशांत फतेहपूरचे डीएम असताना त्यांना जून 2018 मध्ये निलंबित करण्यात आले होते.- देवेंद्र कुमार पांडे यांना उन्नावमध्ये डीएम असताना फेब्रुवारी 2020 मध्ये निलंबित करण्यात आले होते.- टीके शिबू यांना 31 मार्च 2022 रोजी सोनभद्रच्या जिल्हा दंडाधिकारी पदावरून निलंबित करण्यात आले होते.- सुनील कुमार वर्मा यांना 4 एप्रिल 2022 रोजी औरैयाच्या जिल्हा दंडाधिकारी पदावरून निलंबित करण्यात आले होते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ