बंगळुरू : कर्नाटक सरकारचे वरिष्ठ आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. मोहसिन यांनी कोरोनामुक्त झालेल्या तबलीगी जमातीच्या सदस्यांनी प्लाझ्मा दान केल्याने त्यांची स्तुती केली होती. मोहसिन हे तेच अधिकारी आहेत ज्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणूक आयोगाने त्यांचे निलंबन केले होते.
मोहसिन य़ांनी २७ एप्रिलला ट्विट केले होते. यावेळी त्यांनी म्हटले होते की, ३०० हून अधिक तबलिगी जमातीच्या हिरोंनी एकट्या दिल्लीमध्ये प्लाझ्मा देशासाठी दान केला आहे. कोणासाठी ? गोदी मीडिया या हिरोंच्या मानवतेसाठी केलेल्या कामाला दाखविणार नाही.
या ट्विटवरून वाद झाला होता. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे ट्वीट करणे चुकीचे असल्याचे मत अनेकांना नोंदविले होते. मोहसिन हे कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी असून मुळचे बिहारचे आहेत. कर्नाटक सरकारने यावर स्पष्टीकरण देताना त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आल्याचे म्हटले आहे. यामध्ये या ट्विटमुळे मीडियामध्ये नकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. याला सरकारने गंभीरतेने घेतले आहे. कोविड-19 गंभीर प्रकार असून यासाठी संवेदनशीलतेने वागणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे.
सामान्य नागरिकांवर कारवाई करताना सरकार ताकदवर अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याच कचरणार नसल्याचा संदेश सरकारने दिल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. कोरोना विरोधात एकत्र येण्याची गरज असताना अशा प्रकारे कोणी वक्तव्ये करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
"भारत आणि बंगालदरम्यान काहींना युद्ध हवेय"; ममता बॅनर्जींवर जावडेकरांचा गंभीर आरोप
लॉकडाऊनमध्ये नशेत वेगाने कार घेऊन तरुण बेडरूममध्ये घुसला अन्...