ब्रिटनच्याच (Britain) कंपनीने आणि विद्यापीठाने निर्माण केलेल्या कोव्हिशिल्ड (Covishield) लस घेणाऱ्या भारतीय लोकांना ब्रिटनने प्रवास नाकारला होता. भारत सरकारने यावर आम्हीपण जशास तशी कारवाई करण्याची धमकी देताच लस घेतलेल्यांना क्वारंटाईनच्या अटीवर प्रवेस देण्यास ब्रिटन तयार झाला. परंतू, भारतातील कोविन डेटावर संशय व्यक्त करत तो विश्वासार्ह नसल्याचे म्हटले. यावर भारत सरकारच्या एका आयएएस अधिकाऱ्याने ब्रिटनची पोलखोल करत हातचा आरसा दाखविला आहे. (A smart covid certificate with QR code is not acceptable in UK but this handwritten slip is)
बारकोड सारखे अद्ययावत तंत्रज्ञान वापरून भारताने लस घेतलेल्या लोकांचा कोविनद्वारे डेटा तयार केला आहे. एवढे अद्ययावत असताना ब्रिटन त्यावर संशय व्यक्त करत आहे. कोणी पहिला, कोणी दुसरा घेतला याची माहिती डिजिटली एका सर्टिफिकेटवर दिला जात आहे. तरीही अशी वागणूक मिळत असल्याने एका अधिकाऱ्याने ब्रिटनमध्ये लस घेतलेल्यांची नोंद कशी ठेवली जाते, याचा फोटोच पोस्ट केला आहे.
ब्रिटनमध्ये तर हाताने लिहिलेले कार्ड दिले जाते. त्यावर पहिला डोस कधी घेतला, दुसरा कधी घेतला हे नाव आणि लॉट नंबरसह लिहिले जात आहे. जॉन्सनची सिंगल डोसवाली लस घेतली तर कोविड पाससाठी त्यांच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो. याच्या 5 दिवसांनंतर पास मिळतो. पुढारलेल्या देशात एवढी यंत्रणा आहे आणि भारताच्या डिजिटल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या कार्डला कोविड व्हॅक्सिनेशन रेकॉर्ड कार्ड असे नाव दिले आहे.