नवी दिल्लीः सीबीएसईने बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात अनेक मुलांनी चांगले गुण संपादन केले आहेत. तर काहींना अपेक्षित गुण मिळालेले नाहीत. बर्याचदा अशा परीक्षांमध्ये कमी गुण मिळालेली मुलं स्वतःमध्ये उणिवा शोधत राहतात. ज्या मुलांचे चांगले गुण येतात, त्यांना कुटुंब आणि समाजात खूप प्रेम मिळते. दुसरीकडे कमी गुण आणणा-या मुलांना वाईट वाटून त्यांच्या मानसिक आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून लोक आणि पालक त्यांची समजूत काढतात. याच दरम्यान ट्विटरवर अहमदाबादचे पालिका उपायुक्त नितीन सांगवान यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. आयएएस नितीन सांगवान यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षेत आपले गुण या पोस्टच्या माध्यमातून शेअर केले आहेत.नितीन सांगवान यांनी ट्विटर हँडलवर आपले बारावीचे मार्कशीट शेअर करताना लिहिले आहे की, बारावीच्या परीक्षेत केमिस्ट्रीमध्ये मला 24 गुण मिळाले. उत्तीर्ण गुणांपेक्षा केवळ 1 गुण अधिक आहे. पण मला आयुष्यात काय हवे होते, हे त्यामुळे सिद्ध झालेले नाही. मुलांनो गुणांच्या ओझ्याखाली दबून जाऊ नका. बोर्डाच्या निकालांपेक्षा आयुष्य मोठे आहे. टीका नव्हे, तर आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये झाकून पाहा.
हेही वाचा
चीनसोबतच्या संघर्षातही अमेरिका तैवानला देणार घातक PSC 3 क्षेपणास्त्र प्रणाली; जिनपिंग भडकले
बोगस रेशन कार्डवर आता मिळणार नाही तांदूळ अन् गहू; 'अशा' पद्धतीनं वगळलं जाणार नाव
NCLनं १०वी पास असलेल्यांसाठी काढली मोठी नोकरभरती; असा करा अर्ज...
20 लाख रुपये किलोनं विकला जातो भारतातील 'हा' किडा, पण चीननं सगळा 'राडा' केला!
अमेरिकेच्या प्रभावात असलेल्या भारताला इराणचा झटका; 'या' मोठ्या परियोजनेतून केलं बाहेर