UPSC नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. काही इच्छुक पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नातच यशस्वी होतात. तर काहींना अनेक अपयशानंतर यश मिळते. एका शेतकऱ्याच्या मुलीची यशोगाथा समोर आली आहे. जी दुसऱ्या प्रयत्नात 23 वी रँक मिळवून आयएएस होण्यात यशस्वी झाली. IAS तपस्या परिहार 2021 मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आली, खासकरून जेव्हा तिने आपल्या लग्नात कन्यादान करण्यास नकार दिला.
IAS तपस्या परिहार या मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथील रहिवासी आहेत. तिचे वडील विश्वास परिहार हे शेतकरी आहेत. तपस्या परिहारने आपल्या लग्नात कन्यादान करण्यास नकार दिला होता. त्यानंतर ती खूप चर्चेत आली. तिने 2021 मध्ये IFS अधिकारी गर्वित गंगवारशी लग्न केलं आहे.
तपस्याने तिचे शालेय शिक्षण नरसिंहपूरच्या केंद्रीय विद्यालयातून झालं आहे. यानंतर तिने इंडिया लॉ सोसायटीच्या लॉ स्कूल, पुणे येथून एलएलबी केले. लॉ केल्यानंतर तिने यूपीएससीची तयारी सुरू केली. तपस्याने पहिल्याच प्रयत्नात कोचिंगची मदत घेतली होती. पण ती अपयशी ठरली.
यूपीएससी परीक्षेतील पहिल्या अपयशापासून शिकून तपस्याने दुसऱ्या प्रयत्नात स्वत:चा अभ्यास आणि नोट्स बनवण्यावर लक्ष केंद्रित केले. यावेळी तिने रिविजनवरही बराच भर दिला. तिच्या मेहनतीमुळे ती 23 व्या रँकसह 2017 मध्ये IAS होण्यात यशस्वी झाली. मॉक टेस्ट देण्याबरोबरच तिने आन्सर रायटिंगचा भरपूर सराव केला होता.
2021 मध्ये जेव्हा तपस्या परिहार IFS अधिकारी गर्वित गंगवारशी लग्न करत होती, तेव्हा तिने कन्यादान करण्यास नकार दिला आणि वडिलांनी दान करायला ती काही वस्तू नाही असं म्हटलं. कुटुंबीयांसह वराच्या बाजूच्या लोकांनीही कन्यादान न करताही लग्न होऊ शकतं हे मान्य केलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे व़ृत्त दिले आहे.