झारखंडच्या पलामू जिल्ह्यातून एक चकीत करणारी घटना समोर आली आहे. बदली झाल्यानंतर कार्यालयातून बाहेर पडताना एका IAS अधिकाऱ्याने कार्यालयातील शिपायाच्या पायाला स्पर्श केला आणि आशीर्वाद घेतले. त्यांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा होत आहे.
पलामू जिल्ह्यात जवळपास वर्षभर उपायुक्त म्हणून काम केलेले आयएएस अधिकारी ए दोड्डे यांची बदली झाली. शुक्रवारी कार्यालय सोडताना त्यांनी कार्यालयातील शिपाई नंदलाल प्रसाद यांच्या पायाला स्पर्श केला.
पायांना स्पर्श करताना म्हणाले की, जो अधिकाऱ्याची सर्वात जास्त सेवा करतो, तो त्या कार्यालयाचा शिपाई असतो. माझे वडीलही शिपाई होते. आयएएस अधिकाऱ्याने शिपायाच्या पायाला स्पर्श करताना पाहून शेजारी उभे असलेले इतर अधिकारी व कर्मचारी चकीत झाले. ए.दोड्डे यांनी इतर सहकाऱ्यांचाही शाल देऊन गौरव केला.
असे क्वचितच किंवा पहिल्यांदाच घडले असेल की, एक उच्च पदस्त अधिकारी शिपायाच्या पायाचे आशीर्वाद घेतोय. उपायुक्तांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.