आयएएस अधिकारी बनणं हे खूप कठीण आहे, जर एखाद्याने कठोर परिश्रम केले तर हे नक्कीच होऊ शकतं. काही जण पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होतात तर काहींना अनेक प्रयत्नांनंतर यश मिळते. असेच एक अधिकारी म्हणजे प्रदीप द्विवेदी. ज्यांनी तिसर्या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण केली आणि संपूर्ण भारतात 74 वा क्रमांक मिळवला आहे. अनेक वर्षांच्या कष्टाचं त्यांना फळ मिळालं आहे.
प्रदीप हे बुंदेलखंडचे रहिवासी असून ते एका सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्यांचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी होती. प्रदीप यांनी हिंदी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले आहे. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण गावातूनच केले. प्रदीप यांनी लहानपणी खूप संघर्ष केला आणि भोपाळमधून इंजिनीअरिंग करण्याचा निर्णय घेतला. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना मध्य प्रदेश वीज विभागात नोकरी मिळाली.
काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी फक्त दोनदाच UPSC मध्ये बसायचे ठरवले, त्यांनी आधीच निर्णय घेतला होता. मात्र, त्यांनी जे लक्ष्य ठेवले होते ते साध्य करण्यासाठी त्यांना तिसरा प्रयत्न करावा लागला. प्रदीप यांनी पहिल्यांदा परीक्षा दिली तेव्हा त्याला ती क्लिअर करता आली नाही. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याची रँक 491 होती, मात्र ते त्याच्या रँकवर समाधानी नव्हते. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि तिसऱ्यांदा ऑल इंडिया रँक 74 मिळवला.
प्रदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, तयारी सुरू करण्यापूर्वी वेबसाईटवर यूपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि पॅटर्न तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार, तुम्ही अभ्यासासाठी तयारी करणे सुरू करू शकता. सुरुवातीला फॉर्मल प्रशिक्षणाची गरज नाही, परंतु मेनसारख्या परीक्षांसाठी फॉर्मल प्रशिक्षणाचा पर्याय निवडला जाऊ शकतो. यूपीएससीची तयारी करताना त्यांनी सेल्फ स्टडीववर फोकस केला आणि त्याला अधिक महत्त्व दिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"