प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. प्रीति हुड्डा यांनी सर्व अडथळे पार करून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. याच दरम्यान त्यांना आर्थिक अडचणींसह अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. प्रीती सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होत्या. प्रीती यांचे कुटुंब हरियाणातील बहादूरगडचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील दिल्ली परिवहन महामंडळ (DTC) मध्ये बस चालक म्हणून काम करत होते.
प्रीती यांनी UPSC उत्तीर्ण होण्यासाठी जबरदस्त प्लॅनिंग केले होते. सर्वप्रथम त्यांनी हिंदीत तयारी करण्याचे ठरवले. त्यांनी हिंदीची निवडही केली. मात्र, जेव्हा त्या पहिल्यांदा UPSC परीक्षेला बसायला गेल्या तेव्हा त्यांची निराशा झाली. पण त्यांनी स्वत:ला सांभाळले आणि 2017 मध्ये पुन्हा परीक्षा दिली. यावेळी 288 व्या रँक आला. आयएएस प्रीती सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होत्या. 10वीत 77 टक्के, तर 12वीत 87 टक्के गुण मिळाले होते. सुरुवातीला प्रीती य़ांना सरकारी सेवेत रुजू होण्यास फारसा रस नव्हता.
कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे प्रीती यांच्या पालकांनी तिला अभ्यास सोडून लग्न करण्याचा सल्लाही दिला. पण प्रीती अभ्यासात खूप दक्ष होत्या. त्यांनी दिल्लीच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि येथून हिंदीत पदवी संपादन केली. पदवीनंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून हिंदीमध्ये पीएचडीचा अभ्यास सुरू केला. प्रीतीने सांगितले की, आयएएस म्हणून काम करावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. त्यांनी सांगितले की, जेएनयूमध्ये प्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदा यूपीएससीची माहिती मिळाली.
परीक्षेची तयारी कशी करावी?
यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रीती यांनी पूर्णपणे नवीन मार्ग स्वीकारला. याच दरम्यान त्यांनी अभ्यासासोबतच स्वत:लाही वेळ दिला. जास्त वेळ बसून 10-10 तास अभ्यास करण्यापेक्षा थोडा विचारपूर्वक अभ्यास करायला हवा, असे त्यांनी सांगितले. यूपीएससी परीक्षेची तयारी करताना जीवनाचा आनंद घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांचे मत आहे. तरुणांनी भरपूर पुस्तके वाचण्यावर भर न देता पूर्ण आत्मविश्वासाने अभ्यासक्रम कव्हर करावा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"