शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

आयुक्तांनी सरकारी बसमधून प्रवास केला; तब्बल २७ ड्रायव्हर, कंडक्टरच्या नोकऱ्या गेल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 2:34 PM

आयुक्तांच्या बस प्रवासानं परिवहन विभागात खळबळ; बसेसची देखभाल करणाऱ्या एजन्सीला कारणे दाखवा नोटीस

लखनऊ: उत्तर प्रदेशातील कानपूरचे आयुक्त डॉ. राजशेखर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये राजशेखर एका सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे सरकारी बसमधून प्रवास करताना दिसत आहेत. बस प्रवासात सामान्य प्रवाशांना अडचणी जाणून घेण्यासाठी आयुक्तांनी बसमधून प्रवास केला. आयुक्तांच्या या प्रवासानंतर परिवहन विभागात खळबळ उडाली.

१३ बस वाहक, १४ चालकांविरोधात कारवाईआयुक्त राजशेखर यांच्यासोबतच जिल्ह्यातील आणखी ७ अधिकाऱ्यांनीदेखील सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे प्रवास केला. जवळपास सगळ्याच बसमधील वाहक, चालक विनामास्क आढळून आले. याशिवाय तिकिटामध्ये अपहार होत असल्याचंही दिसून आलं. वाहक काही प्रवाशांकडून पैसे घेतात. मात्र त्यांना तिकीट देत नसल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतर तातडीनं १३ बस चालकांना निलंबित करण्यात आलं. १४ चालकांची सेवा संपवण्याचा आदेश आयुक्तांनी दिला. 

एआरएमला नोटीस बजावलीअनेक बसेसची देखभाल नीट होत नसल्याची बाब आयुक्तांच्या लक्षात आली. त्यानंतर एआरएमला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. बसेसच्या देखभाल दुरुस्तीचं काम करणाऱ्या खासगी एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याची तयारी सुरू झाली आहे. सध्या या एजन्सीलादेखील कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे.