'फ्लाइंग किस'वर लेडी IAS'चे ट्विट; महिला खासदारांना सुनावलं, म्हणाल्या, 'मणिपूरच्या महिलांना...;
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 10:01 AM2023-08-10T10:01:22+5:302023-08-10T10:04:14+5:30
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किस देण्याचा आरोप करत भाजपच्या २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किस देण्याचा आरोप करत भाजपच्या २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. यामुळे राहुल गांधी यांचे खरे चरित्र बाहेर आले, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. यावर आता एका महिला आयएएस अधिकाऱ्यांनी ट्विट करुन सुनावलं आहे.
मध्यप्रदेश येथील आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन यांनी हे ट्विट केले आहे. महिला खासदारांनी मणिपूर येथील महिलांवर झालेल्या अत्याच्यारावरही विचार केला पाहिजे असं म्हटले आहे. आयएएस महिला अधिकाऱ्याने मणिपूरमधील समोर आलेल्या एका व्हिडिओचा संदर्भ दिला आहे.
खरेच फ्लाइंग किस दिले का? भाजपच्या २२ महिला खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार
IAS अधिकारी शैलबाला मार्टिन यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, "जरा कल्पना करा की मणिपूरच्या महिलांना कसे वाटले असेल?" या ट्विटमध्ये त्यांनी काल महिला खासदारांनी सह्या करुन तक्रार केलेले पत्र ट्विट केले आहे.
मध्य प्रदेश केडरच्या आयएएस सध्या भोपाळमधील मंत्रालयमध्ये सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त सचिव म्हणून तैनात आहेत. बुधवारी राहुल गांधी चर्चेत भाग घेऊन सभागृहातून बाहेर पडत असताना सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांनी केलेल्या टिप्पणीवर राहुल गांधींनी 'फ्लाइंग किस'चे हावभाव दाखवले, असा आरोप आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किस देण्याचा आरोप करत भाजपच्या २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. यामुळे राहुल गांधी यांचे खरे चरित्र बाहेर आले, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. मात्र भाजप खासदार हेमा मालिनी यांनी संसदेत असे काही झालेच नसल्याचे सांगत स्मृती इराणींच्या दाव्यातील हवाच काढली.
काँग्रेस म्हणते...
काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी कोणालाही फ्लाइंग किस दिलेले नाही. त्यांच्या हातून काही कागदपत्रे पडली होती. ती उचलत असताना त्यांच्या हाताकडे पाहून असे वाटले असावे. तसेही भाजपचे सरकार राहुल गांधी यांना संसदेत पाहू इच्छित नाही.
ज़रा सोचिए मणिपुर की महिलाओं को कैसा महसूस हुआ होगा? pic.twitter.com/lINeLtQyuT
— Shailbala Martin (@MartinShailbala) August 9, 2023