शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

Success Story: कौटुंबिक हिंसा अन् घटस्फोटाची कोर्ट केस; अनेक संकटांवर मात करून शिवांगी गोयल बनल्या IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 8:21 PM

Success Story, IAS Shivangi Goyal: दरवर्षी UPSC परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांपैकी अनेकांची स्टोरी प्रेरणादायी असते.

नवी दिल्ली : दरवर्षी UPSC परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांपैकी अनेकांची स्टोरी प्रेरणादायी असते. गरीबीतून यशाचे शिखर गाठलेल्या अधिकाऱ्यांची कहाणी कुणालाही प्रेरणा देण्यासाठी पुरेशी असते. UPSC CSE 2021 ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिवांगी गोयल यांची यशोगाथा ही जगातील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणा आहे. 

दरम्यान, उत्तर प्रदेशातील हापूरच्या पिलखुवा शहरात राहणाऱ्या शिवांगी गोयल यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. लग्नानंतर पती आणि सासरच्यांनी त्यांचा खूप छळ केला. पण त्यांनी हार मानली नाही आणि आपल्या ध्येयावर ठाम राहून यशाचे शिखर गाठले.  

पतीच्या त्रासाला कंटाळून आल्या माहेरी शिवांगी गोयल अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी लग्नापूर्वी दोनदा यूपीएससीची परीक्षा दिली होती. पण दोन्ही वेळा अपयश आले. लग्नाच्या काही कालावधीनंतर पती व सासरच्या लोकांनी त्यांना मारहाण व छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांना एक मुलगी झाली. तिच्या जन्मानंतरही पतीचा दृष्टिकोन बदलला नाही आणि नंतर त्यांना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या माहेरच्या घरी बोलावले.

माहेरी मिळाला आशेचा किरण शिवांगी गोयल आपल्या 7 वर्षांच्या मुलीला घेऊन माहेरी आल्या तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सल्ला दिला की, तुला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मी वाटेल ते करेन. खूप आश्वासन आणि आशा मिळाल्यानंतर शिवांगी यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. यावेळी म्हणजे 2021 मध्ये त्या तिसर्‍या प्रयत्नात 177 व्या रँकसह IAS अधिकारी बनल्या.

कुटुंबाला दिले यशाचे श्रेयशिवांगी गोयल यांचे लग्नानंतरचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. त्या पूर्णपणे खचल्या होत्या. या सगळ्यातून बाहेर पडून आपल्या मुलीचे आयुष्य कसे चांगले करावे हे त्यांना समजत नव्हते. शिवांगी गोयल यांचा घटस्फोटाचा खटला UPSC परीक्षेचा निकाल येईपर्यंत कोर्टात सुरू होता. पण त्या त्यांच्या ध्येयावर टिकून राहिल्या आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीupscकेंद्रीय लोकसेवा आयोग