शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
4
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
5
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
6
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
7
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
8
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
9
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
10
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
11
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
12
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
13
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
14
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
15
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
16
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
17
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
18
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
19
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
20
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!

IAS Story: फक्त एका चुकीमुळं 6 दिवसांत गेलं 'या' IAS अधिकाऱ्याचं कलेक्टर पद, असं होतं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 1:02 PM

श्रीराम व्यंकटरमण हे एक असे आयएएस अधिकारी आहेत, ज्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची सर्वात कठीण परीक्षा दुसऱ्या रँकसह क्रॅक केली. ते 2012 चे UPSC टॉपर होते.

यूपीएससी सिव्हिल सर्व्हीस, ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. ही परीक्ष क्रॅक करणे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतात. श्रीराम व्यंकटरमण हे एक असे आयएएस अधिकारी आहेत, ज्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची सर्वात कठीण परीक्षा दुसऱ्या रँकसह क्रॅक केली होती. ते 2012 चे UPSC टॉपर होते. खरे तर ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 5 ते 10 वर्षेही लागतात. मात्र, यांपैकी काही आयएएस असे असतात, ज्यांना फार लवकर कलेक्‍टर पदाची पोस्टिंग मिळते. पण विचार करा की, जर कवळ 6 दिवसांतच एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाली तर त्याला किती वाईट वाटत असेल. असेच IAS श्रीराम व्यंकटरमण यांच्यासोबत घडले आहे.

दारूमुळे गेली कलेक्‍टरकी! -IAS श्रीराम व्यंकटरमन यांनी 2019 मध्ये नशेत गाडी चालवली आणि एका पत्रकाराला धडकले होते, असा आरोप आहे. या घटनेत पत्रकार केएम बशीर यांचा मृत्यू झाला होता. 35 वर्षीय बशीर सिराज ब्यूरो चीफ होते. यानंतर केरळ सरकारने त्यांना अलपुझा जिल्ह्याचे कलेक्टर बनवले होते. यामुळे तेथील जनतेने त्यांचा विरोध केला होता. यानंतर, सरकारला त्यांना कलेक्टर अथवा जिल्हाधिकारी पदावरून हटवावे लागले होते आणि त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली होती. 

डॉक्टर ते IAS पर्यंतचा प्रवास - व्यंकटरमन यांनी एमबीबीएस केल्यानंतर, यूपीएससी (UPSC) सिव्हिल सर्व्हिसची तयारी केली होती आणि दुसऱ्याच प्रयत्नात ते यशस्वी झाले. एका IAS अधिकाऱ्याच्या रुपात व्यंकटरमन हे वादात राहिले आहेत. त्यांचे शालेय शिक्षण भावांश विद्या मंदिर-गिरिनगर येथून पूर्ण झाले आहे. यानंतर त्यांनी वर्ष 2010 मध्ये गव्हर्नमेन्ट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झाले.

तिरुवनंतपुरम जिल्हा न्यायालयाने IAS अधिकारी श्रीराम व्यंकटरमन यांच्यावरील हत्येचा आरोप रद्द केला आहे. केरळ सरकारनेही 2020 मध्ये व्यंकटरमन यांचे निलंबन रद्द केलो होते. यानंतर त्यांच्याकडे आरोग्य विभागातचे ज्वाइंट सेक्रेटरी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. ते सध्या केरल स्टेट सिव्हिल सप्लाईज कॉर्पोरेशन लिमिटेडचे जनरल मॅनेजर आहेत.

टॅग्स :Keralaकेरळcollectorजिल्हाधिकारी