शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

कमाल! सहावीत नापास झाली पण 'ती' खचली नाही; IAS अधिकारी होऊन घेतली नेत्रदिपक भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 3:12 PM

IAS Rukmani Riar : रुक्मणी रियार यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया. ज्यांनी पहिल्‍याच प्रयत्नाच संपूर्ण भारतातून दुसरे स्‍थान मिळवून आयएएस अधिकारी होण्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण केले आहे. 

दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC ची तयारी करतात, अनेक उमेदवार या परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंगची मदत घेतात, तर काही सेल्फ स्टडीवर अधिक भर देतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. पंजाबच्‍या गुरदासपूरच्‍या रहिवासी रुक्मणी रियार (IAS Rukmani Riar) यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया. ज्यांनी पहिल्‍याच प्रयत्नाच संपूर्ण भारतातून दुसरे स्‍थान मिळवून आयएएस अधिकारी होण्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण केले आहे. 

रुक्मणी रियार सुरुवातीला अभ्यासात फार हुशार नव्हत्या. इयत्ता सहावीत असताना त्या नापास झाल्या होत्या, नापास झाल्यावर त्य़ांनी कुटुंब आणि शिक्षकांसमोर जाण्याची हिंमत केली नाही आणि याबद्दल त्यांना खूप लाज वाटली. तसेच लोक आपल्याबद्दल काय विचार करतील याचाही खूप त्रास झाला. काही महिन्यांनंतर, त्यांनी स्वतःला या नैराश्यातून बाहेर काढले आणि अभ्यास सुरू केला. रुक्मणी रियार यांनी गुरुदासपूर येथून सुरुवातीचे शिक्षण घेतले.

बारावीनंतर रुक्मणी यांनी अमृतसर येथील गुरू नानक देव विद्यापीठातून सोशल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलं. त्यांनी मुंबईतील टाटा इन्स्टीट्यूटमध्ये पुढचं शिक्षण घेतलं आणि सुवर्णपदक पटकावलं. यानंतर रुक्मणी यूपीएससीकडे वळल्या आणि तयारी करू लागल्या. पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळालं, त्यासाठी त्यांनी सेल्फ स्टडीकडे अधिक लक्ष दिले. रुक्मणी यांनी 2011 मध्ये यूपीएससीमध्ये ऑल इंडिया रँक 2 मिळवला आणि आयएस झाल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी