शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

केरळमधल्या "गाझा स्ट्रीट"मुळे IB, NIA सतर्क

By admin | Published: June 19, 2017 5:20 PM

केरळमधल्या कासरागोड नगरपालिकेच्या हद्दीतील तिरुत्ती वॉर्डमधल्या एका रस्त्याचं नामकरण गाझा स्ट्रीट असं करण्यात आलं आहे

ऑनलाइन लोकमत

तिरुवनंतपुरम, दि. 19 - केरळमधल्या कासरागोड नगरपालिकेच्या हद्दीतील तिरुत्ती वॉर्डमधल्या एका रस्त्याचं नामकरण गाझा स्ट्रीट असं करण्यात आलं आहे. त्यामुळे IB, NIA यांसारख्या गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच सुरक्षा यंत्रणांची या गाझा स्ट्रीट रस्त्यावर विशेष नजर आहे. खरं तर इज्राएल आणि पॅलेस्टिनी लोकांमध्ये गाझा पट्टी या नावाच्या जागेवरूनच वाद आहे. सुरक्षा यंत्रणांनी या नामकरणामागे कट्टरपंथीयांना जबाबदार धरलं आहे. केरळ राज्यातून जवळपास 21 तरुण गेल्या वर्षीपासून बेपत्ता झाले आहेत. ते सर्व अशाच कट्टरपंथीयांच्या प्रभावात असल्याची चर्चा आहे. तिरुत्ती येथे जामा मशिदीजवळच्या एका रस्त्याचं नाव गेल्या महिन्यात गाझा असं ठेवण्यात आलं. याचं उद्घाटन कासरगोड जिल्हा पंचायत अध्यक्ष बशीर यांनी केलं. बशीर यांना शेवटच्या मिनिटाला रस्त्याच्या उद्घाटनाला बोलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच मला या वादविवादाबाबत काहीच माहीत नाही, असंही ते म्हणाले आहेत. नगरपालिका अधिका-यांनाही रस्त्याचं नाव गाझा हे ठेवण्यात आल्याची कल्पना नाही. अधिका-यांना आम्हाला याबाबत काहीच माहिती नसल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या नामकरणाचा प्रस्तावही नगरपालिकेत मंजूर करण्यात आला नव्हता. त्यामुळे गुप्तचर यंत्रणाही खडबडून जाग्या झाल्या आहेत. कासरागोड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पी रमेश म्हणाले, रस्त्याच्या गाझा स्ट्रीट या नामकरणाचा प्रस्ताव नगरपालिकेत सादर केल्यास त्याला विरोध दर्शवला जाईल. तसेच गुप्तचर यंत्रणा या भागातील विकासावर लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे इसिससारख्या कट्टरपंथी दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी अनेक तरुण देश सोडून गेले आहेत. त्यात जास्त करून कासरागोड तालुक्यातील तरुणांचा समावेश आहे. त्यामुळे सद्यस्थितीत गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.