शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

हिमाचल, उत्तराखंड, काश्मिरात बर्फवृष्टी

By admin | Published: January 08, 2017 12:50 AM

तुफान बर्फवृष्टीमुळे काश्मीरचा उर्वरित देशापासूनचा संपर्क सलग दुसऱ्या दिवशी तुटलेलाच राहिला. बहुतांश ठिकाणी पारा शून्याच्या खाली आला आहे. गुलमर्ग हे राज्यातील सर्वांत

नवी दिल्ली : तुफान बर्फवृष्टीमुळे काश्मीरचा उर्वरित देशापासूनचा संपर्क सलग दुसऱ्या दिवशी तुटलेलाच राहिला. बहुतांश ठिकाणी पारा शून्याच्या खाली आला आहे. गुलमर्ग हे राज्यातील सर्वांत थंड ठिकाण ठरले. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडातही बर्फवृष्टी झाली असून, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत पाऊस झाला आहे. काश्मीर खोऱ्याची जीवन रेषा असलेला श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी वाहतुकीसाठी बंद राहिला. पीर पांजाल पर्वतराजीत अनेक ठिकाणी बर्फाचे कडे कोसळून, तसेच जमीन खचून महामार्ग बंद झाला आहे. श्रीनगर विमानतळाच्या धावपट्टीवर बर्फ साचला असल्याने, हवाई वाहतूकही ठप्प आहे. गुलमर्ग स्की रिसॉर्ट येथील तापमान उणे (-) ८.४ अंशावर घसरले आहे. हे राज्यातील सर्वांत थंड ठिकाण ठरले. पहलगाम, लेह लदाख आणि राजधानी श्रीनगर अशा बहुतांश सर्वच ठिकाणी तापमान शून्याच्या खाली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली. हिमाचल प्रदेशातील सिमलात या वर्षाची पहिली बर्फवृष्टी झाली. रस्ते बंद झाल्यामुळे सिमला आणि किन्नौर भागाचा संपर्क तुटला आहे. सिमला आणि भुंटर येथील तापमान 0.२ अंशांपर्यंत घसरले आहे. उत्तराखंडमधील नैनितालमध्ये दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच बर्फ पडला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)- मसुरीतही बर्फवृष्टी झाली. कुमाँव आणि गढवाल भागात जोरदार बर्फवृष्टी झाली. हिमालयातील चारधाम यात्रेतील जगप्रसिद्ध मंदिरांचे मार्ग बर्फवृष्टीमुळे बंद झाले आहेत. राज्याच्या मैदानी प्रदेशात जोरदार पाऊस झाला.