नवी दिल्ली : कोरोनामुक्त झालेले अनेक रुग्ण काही विशिष्ट रोगांवर शस्त्रक्रिया (जी लगेच करणे आवश्यक नाही) करण्यापूर्वी प्री-ऑपरेटिव्ह प्रोटोकॉल अंतर्गत पुन्हा एकदा आपली आरटी-पीसीआर किंवा अँटीजन टेस्ट करतात. मात्र भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि कोविड -19 साठी तयार केलेल्या राष्ट्रीय टास्क फोर्सच्या (एनटीएफ) तज्ज्ञांची प्रतिक्रिया या विरोधात आहे. (icmr advice for coronavirus recovered patients surgery procedure)
सोमवारी (31 मे 2021) टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आयसीएमआर आणि एनटीएफच्या तज्ज्ञांनी कोरोना विषाणूपासून बरे होण्याच्या 102 दिवसांत आरटी-पीसीआर किंवा अँटीजन टेस्ट न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी अधोरेखित केले आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतरही लोकांच्या शरीरात 'मृत विषाणूचे कण' आढळतात आणि यामुळे असे होऊ शकते की, कोविड टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह येऊ शकतो, जो चुकीचा आहे.
कोरोनामुक्त झाल्यानंतर 102 दिवसांनी कोरोनाची टेस्ट करायाचबरोबर, तज्ज्ञांनी असेही म्हटले आहे की, सर्जनने कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांची शस्त्रक्रिया (नॉन-अर्जेन्ट) किमान 42 दिवसानंतरच (6 आठवडे) करावी, जेणेकरून रुग्णांच्या आरोग्यास लवकरात लवकर लाभ मिळू शकेल. टास्क फोर्सचे तज्ज्ञ संजय पुजारी यांना सांगितले की, 'कोरोनाहून बरे झाल्यानंतर 102 दिवसानंतरच कोविडच्या पुन्हा संसर्गाची पुष्टी होते. त्यामुळे या काळात पुन्हा कोरोना चाचणी घेणे चांगले नाही'.
'कोविड-19 ची उत्पत्ती शोधा, अन्यथा...', अमेरिकेच्या तज्ज्ञांचा इशाराअमेरिकेतील मीडिया कंपनी ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, कोरोना उत्पत्तीच्या अनुषंगाने अमेरिकेतील दोन तज्ज्ञांनी मोठा इशारा दिला आहे. कोविड-19ची (Covid-19) ची उत्पत्ती कुठे झाली याचा शोध लावणे गरजेचे आहे. अन्यथा कोविड-26 (Covid-26), कोविड-32 (Covid-32) यांचा सामना करण्यासाठी तयार राहावं लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. हा इशारा अमेरिकेच्या (America) तत्कालीन डोनाल्ड ट्रम्प सरकारमधील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त स्कॉट गॉटलीब आणि टेक्सास येथील चिल्ड्रन हॉस्पिटल फॉर व्हॅक्सिन डेव्हलपमेंटचे सहसंचालक पीटर होट्स यांनी दिला आहे. स्कॉट गॉटलीब हे सध्या फायझर या औषध कंपनीच्या बोर्डचे सदस्य आहेत. स्कॉट गॉटलीब, पीटर होट्स यांनी सांगितले की, कोविड -19च्या उत्पत्ती बाबत आणि भविष्यातील महामारीचा (Pandemic) उद्रेक रोखण्यासाठी चीन सरकारने जगाला मदत केली पाहिजे.