नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. संसदेची नवीन इमारत बांधणाऱ्या कामगारांचा पंतप्रधान मोदींनी सन्मान केला. जवळपास 971 कोटी रुपये खर्चून बांधलेले, नवीन संसद भवन भारताच्या प्रगतीचे प्रतीक आहे आणि सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे. नवी संसद भवन त्रिकोणी आकारात बांधण्यात आली आहे. याच दरम्यान "भव्य-दिव्य इमारत सक्षमीकरणासोबतच देशाच्या समृद्धी, सामर्थ्याला नवी गती, बळ देईल" असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
"आजचा दिवस आपल्या सर्व देशवासियांसाठी अविस्मरणीय आहे. संसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांना अभिमानाने आणि आशेने भरून टाकणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ही भव्य-दिव्य इमारत लोकांच्या सक्षमीकरणासोबतच देशाच्या समृद्धी आणि सामर्थ्याला नवी गती आणि बळ देईल" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत.नव्या संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्याचा दुसरा टप्पा 12 च्या सुमारास सुरू होणार आहे.
Video - पंतप्रधान मोदींचा साधूसंतांच्या उपस्थितीत सेंगोलला साष्टांग नमस्कार; पाहा 'तो' खास क्षण
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची सुरुवात प्रसन्नतेने आणि मोठ्या उत्साहात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पूजा आणि हवन केल्यानंतर सेंगोलची पूजा केली. पीएम मोदींनी सेंगोलच्या राजदंडाला साष्टांग नमस्कार केला. यासोबतच त्यांनी उपस्थित साधूसंताचे आशीर्वादही घेतले. यानंतर पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सभापतींच्या खुर्चीजवळ सेंगोल स्थापित केला आहे.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात हवन आणि पूजेने झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पूजा केली. वैदिक मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व ७७५ खासदार, सर्व राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, सर्व मंत्रालयांचे सचिव, लोकसभेचे माजी अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती यांना सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले.