नवी दिल्ली : एअरसेलचे माजी प्रवर्तक सी. शिवशंकरन यांनी आयडीबीआय बँकेत केलेल्या ६00 कोटींच्या कर्ज घोटाळ्यात मुंबई शेअर बाजाराचे (बीएसई) चेअरमन एस. रवी व बँक आॅफ बडोदाचे माजी व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पी. एस. शेणॉय यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे.एस. रवी हे आयडीबीआय बँकेचे स्वतंत्र संचालक व लेखा परीक्षण समितीचे चेअरमन आहेत. तसेच शेणॉय हे कर्ज मंजूर झाले होते, तेव्हा आयडीबीआय बँकेचे स्वतंत्र संचालक होते. आयडीबीआयने शिवशंकरन यांना दोन कर्जे दिली असून, ती देताना नियम धाब्यावर बसविण्यात आले होते, असे उघड झाले आहे.एस. रवी, शेणॉय, रेगो, खरात व राघवन यांची लवकरच चौकशी केली जाणार आहे. तत्पूर्वी, सीबीआयने आयडीबीआय बँकेच्या सहा अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर धाडी टाकल्या होत्या. यात अमिता नारायण (बँकेच्या कर्ज समितीच्या माजी सीजीएम), आर.के. बन्सल (कर्ज समितीचे तत्कालीन सदस्य), एस.के. श्रीनिवासन (तत्कालीन कार्यकारी संचालक), आर.एस. विद्यासागर (आयडीबीआय बँकेचे विभागीय प्रमुख), भारत पाल सिंग (तत्कालीन उपव्यवस्थापकीय संचालक), मेधा जोशी (जोखीम विभागाच्या प्रमुख) यांचा समावेश आहे.दोन्ही अधिकाºयांवर भ्रष्टाचार, फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यात त्यांनी सिंडिकेट बँकेचे सीईओ मेलवीन रेगो, इंडियन बँकेचे किशोर खरात आणि आयडीबीआय बँकेचे माजी सीएमडी एम.एस. राघवन यांच्याशी हातमिळवणी केल्याचा आरोप आहे.
आयडीबीआय घोटाळा; शेअर बाजाराच्या प्रमुखांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 5:18 AM