नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल हे दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख आहेत, या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आप सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. त्यावर सुनावणीसाठी घटनापीठ स्थापण्याबाबत सर्वोच्च न्यायालय विचार करत आहे. सरन्यायाधीश जे. एस. केहर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने स्पष्ट केले की, हे प्रकरण उन्हाळी सुटीच्या पूर्वी की नंतर विचारार्थ घ्यायचे हे ठरवू. दरम्यान, दिल्ली सरकारकडून अॅड. गोपाळ सुब्रह्मण्यम यांनी सांगितले की, हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठविलेले आहे. १५ फेब्रुवारी रोजी न्या. ए. के. सिकरी आणि न्या. आर. के. अग्रवाल यांच्या पीठाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील आप सरकारची याचिका घटनापीठाकडे पाठविली होती. या निर्णयात न्यायालयाने सांगितले होते की, या प्रकरणात कायदा व घटनेशी संबंधित प्रश्न आहेत. यावर घटनापीठाला निर्णय घ्यावा लागेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘आप’च्या याचिकेवर करणार विचार
By admin | Published: February 24, 2017 1:35 AM