नवी दिल्ली : भविष्यातील दीर्घकालीन गरज लक्षात घेऊन पूर्णपणे नवे संसद भवन बांधण्यासह इतरही पर्यायांवर विचार सुरू असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी येथे सांगितले. मात्र याविषयी अद्याप निर्णय झाला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.नुकत्याच संपलेल्या लोकसभा अधिवेशनातील कामकाजाविषयी माहिती देण्यास घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, पूर्णपणे नवी इमारत न बांधता सध्याच्या संसद भवनाचे आधुनिकीकरण व विस्तार करणे हाही एक पर्याय आहे. लोकसभाध्यक्ष म्हणाले की, नवे संसद भवन बांधले जावे, अशी सर्वसाधारण भावना आहे. यासंबंधी संसद सदस्यांसह संबंधितांची मते जाणून घेण्यासाठी विविध गट स्थापन करण्यात आले आहेत.
नवे संसद भवन बांधण्याचा विचार सुरू - ओम बिर्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 4:07 AM