नवी दिल्ली : भारताची समृद्ध संस्कृती व परंपरेची ओळख करून देण्याच्या हेतूने रविवारी राष्ट्रपती भवनात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वयंसेवी संस्था सहर हा कार्यक्रम सादर करणार असून, २०१०मध्ये ओबामा यांच्या भारतदौऱ्यादरम्यान असाच कार्यक्रम सादर केला होता. सहरचे संचालक संजीव भार्गव यांनी, भारत आपल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीकरिता जगभरात परिचित आहे. ही संस्कृती अद्वितीय असून, ती देशाला वैशिष्ट्यपूर्ण बनविते. मान्यवर व्यक्तींच्या भारतातील ऐतिहासिक भेटींदरम्यान आम्ही हा कार्यक्रम सादर करू इच्छितो. या कार्यक्रमाचा प्रारंभ ऋग्वेदातील ऋचांपासून केला जाणार असून, पुढे त्यात नृत्यासह अनेकविध कार्यक्रम आहेत. यात भारतीय शास्त्रीय नृत्यांमध्ये कथ्थक, मणिपुरी, ओडिशी, भरतनाट्यम् व कथ्थकली सादर केले जाणार आहे.
भारतीय संस्कृतीची ओळख करून देणार
By admin | Published: January 25, 2015 2:20 AM