शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

राम मंदिर खोदकामात आढळल्या प्राचीन मूर्ती, पहिल्यांदाच फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:14 PM

मंदिराचे खोदकाम करताना सापडलेल्या वस्तूंचे फोटो प्रथमच समोर आले आहेत.

अयोध्या - अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे काम प्रगतीपथावर असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिराच्या लोकार्पणाची तारीखही घोषित केलीय. दुसरीकडे श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्राच्या माध्यमातून युद्धपातळीवर मंदिराचे काम पूर्ण होत आहे. ट्रस्टचे महासचिव संपत राय यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये, मंदिराच्या खोदकामावेळी काही प्राचीन मंदिरांचे अवशेष मिळाले असून त्यात मूर्ती व स्तंभ यांचा समावेश आहे. राय यांनी एक फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये हे आढळून आलेले प्राचीन मूर्तींचे अवशेष एकत्र ठेवल्याचं दिसून येत आहे. 

मंदिराचे खोदकाम करताना सापडलेल्या वस्तूंचे फोटो प्रथमच समोर आले आहेत. ज्यामध्ये, डझनभरापेक्षा जास्त मूर्ती, स्तंभ आणि शिलालेख आहेत. या शिलालेखात देवी-देवतांच्या कलाकृती असून फोटोत मंदिरात उभारण्यात येणारे स्तंभही पाहायला मिळत आहेत. राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दर्शनासाठी हे सापडलेले प्राचीन मंदिराचे अवशेष ठेवण्यात येणार असल्याचे समजते. 

मंदिर बनवण्यासाठीचं खोदकाम सुरू झाल्यानंतर ४० ते ५० फूट खोदकाम होताच, या मूर्ती व अवशेष आढळून आले होते. मंदिर परिसरातील खोदकाम करताना ह्या सर्व वस्तू आढळून आल्या आहेत. हिंदूंचा या जागेवरील दावा त्यामुळे अधिक दृढ होतो. ASI सर्वेक्षणातूनही अनेक वस्तू आढळून आल्या आहेत. मंदिर-मस्जीद प्रकरणी कोर्टातील सुनावणीदरम्यान न्यायालयानेही या बाबी विचारात घेतल्या आहेत.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेशCourtन्यायालय