शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

"आप-काँग्रेसमध्ये आघाडी झाली असती तर निकाल बदलला असता…", AAP नेत्याचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 12:42 PM

Haryana Assembly Election Result 2024: निवडणूक निकालाबाबत आप नेते सुशील गुप्ता यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Haryana Assembly Election Result 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. सध्या मतमोजणी सुरू आहे. सध्याचे निकाल पाहता हरयाणात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. मात्र, या निवडणुकीत आम आदमी पक्षही (आप) रिंगणात आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी आप आणि काँग्रेसची आघाडी होऊ शकते, असं निवडणूकीपूर्वी म्हटलं जात होतं, परंतु तसं झालं नाही. दरम्यान, निवडणूक निकालाबाबत आप नेते सुशील गुप्ता यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

हरयाणात काँग्रेस पक्षाचा पराभव झाला तर तुम्ही किंगमेकर व्हाल, या निर्णायक भूमिकेत तुम्ही स्वतःला पाहता का? असं सुशील गुप्ता यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की, याबाबत आकलन करणं माझं काम नाही. दोन्ही पक्षांचे हायकमांड यासंबंधी काय फायदे-तोटे झाले, याचे आकलन करतील. काय व्हायला हवे होते आणि काय व्हायला नको होते. आम्ही सकारात्मक विचार करून हरयाणाची निवडणूक सकारात्मक राजकारणानं लढवली होती, असं सुशील गुप्ता म्हणाले.

हरयाणात काँग्रेस पक्षाचा पराभव झाला तर तुम्ही किंगमेकर व्हाल, या निर्णायक भूमिकेत तुम्ही स्वतःला पाहता का? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की या प्रकरणाचे मूल्यांकन करणे माझे काम नाही. दोन्ही पक्षांचे हायकमांड त्याचे काय फायदे-तोटे झाले, याचे आकलन करतील. काय व्हायला हवे होते आणि काय व्हायला नको होते. आम्ही सकारात्मक विचार करून हरियाणाची निवडणूक सकारात्मक राजकारणाने लढवली होती.

याचबरोबर, आप आणि काँग्रेसची आघाडीच्या मुद्द्यावरही सुशील गुप्ता यांनी भाष्य केलं. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, राष्ट्रीय स्तरावर आघाडी झाली, तर भाजपची अडचण झाली, इथंही असं झालं असतं तर निकाल खूप बदलला असता, असं सुशील गुप्ता म्हणाले. दरम्यान, हरयाणात सध्या भाजप आणि काँग्रेस यांच्यात कडवी लढत सुरू आहे. हे पाहता यावेळी भाजप पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जनतेचा निर्णय आम्हाला मान्य असेल -सुशील गुप्ताआमच्या राष्ट्रीय नेतृत्वाला तुरुंगात डांबण्यात आले. निवडणूक लढवण्यासाठी आमच्याकडे एक रुपयाही नव्हता. मी आधीही म्हटलं होतं की, आमचा प्रत्येक कार्यकर्ता पाणी पिऊन आणि हरभरा खाऊन काम करतो. आमच्याकडे कोणतंही साधन नव्हतं परंतु आम्ही मोठ्या संसाधनांसह या लोकांसोबत लढलो. आम्ही निवडणूक अतिशय सुंदरपणे लढवली आणि आता जनतेचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असंही सुशील गुप्ता म्हणाले.

भाजप हॅट्ट्रिकसह गुलाल उधळणार? हरयाणामध्ये गेल्या १० वर्षापासून भाजप सत्तेवर आहे. या निवडणुकीच्या निकालाचे आतापर्यंतचे आकडे पाहात भाजप हरयाणा विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रीक करताना दिसत आहे. अर्थात येथे भाजप विजयी झाल्यास हॅट्रिकसह गुलाल उधळेल.

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टीElectionनिवडणूक 2024