धार्मिक भावना दुखविणार्यांवर कारवाई न केल्यास आंदोलन अल्पसंख्याक विकास परिषद : पाकिस्तानवरून आलेल्या सिंधी समुदायाची चौकशी करा
By admin | Published: June 24, 2016 9:09 PM
जळगाव : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्या व एका गटाच्या धार्मिक भावना दुखावणार्या लोकांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी अल्पसंख्यांक विकास परिषदेतर्फे शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाकिस्तानातून आलेल्या व जळगावात वास्तव्याला असलेल्या सिंधी नागरिकांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
जळगाव : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्या व एका गटाच्या धार्मिक भावना दुखावणार्या लोकांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी अल्पसंख्यांक विकास परिषदेतर्फे शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाकिस्तानातून आलेल्या व जळगावात वास्तव्याला असलेल्या सिंधी नागरिकांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.मंगळवारी रात्री सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून एका गटाच्या धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी अजिंठा चौफुली परिसरात तुफान दगडफेक झाली होती. या प्रकरणी अटकेतील आरोपींवर कारवाई करण्यासाठी अल्पसंख्याक विकास परिषदेचे महानगराध्यक्ष डॉ.मुबीन अशरफी यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आला. निवासी उपजिल्हाधिकार्यांच्या दालनात तहसीलदार पंकज लोखंडे यांनी मोर्चेकर्यांचे म्हणणे एकून घेत निवेदन स्विकारले.मास्टर माईंड कोण ते शोधासोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून जातीय सलोखा धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अटक केलेले संशयित आरोपी हे सिंधी समुदायाशी संबंधित आहेत. आक्षेपार्ह पोस्ट टाकणे हा षडयंत्राचा भाग आहे. त्या मागचा मास्टर माईंड कोण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. सिंधी कॉलनीतील रहिवाशांची चौकशी कराजळगाव जिल्ात भरपूर सिंधी नागरिक हे पाकिस्तानातून आलेले आहेत. त्यांना तहसीलदारांनी रेशनकार्ड, मतदानकार्ड प्रदान करण्यात आले आहे. तहसीलदारांनी कोणत्या आधारावर हे कागदपत्रे दिले आहेत याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.दगडफेक प्रकरणाची चौकशी करामंगळवारी रात्री दगडफेक करीत जातीय सलोखा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करून दगडफेक कुणी केली याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. चार दिवसात कारवाई न झाल्यास धरणे आंदोलन व रास्तारोको करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी डॉ.मुबीन अशरफी, शेख शाकीर, जमिर खान, शेख खलील, शेख तोफिक, निसार अहमद खान, आरिफ खान, फरहान मोईनोद्दीन, वकार अहमद यांच्यासह २०० ते ३०० जण मोर्चात सहभागी झाले होते.प्रचंड पोलीस बंदोबस्तजिल्हाधिकारी कार्यालयावर २०० ते ३०० जणांचा जमाव आल्यानंतर तत्काळ पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुबेर चवरे यांच्यासह कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. पोलीस मुख्यालयातून जादा मनुष्यबळ मागविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले.