ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश आणि मायावती यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. जर अखिलेश यादव आणि मायावती एकत्र आले, 2019ची लोकसभा निवडणूक नक्कीच जिंकू, असा विश्वास लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केला. अखिलेश यादव आणि मायावती हे 2019च्या निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता आहे. दोघेही एकत्र आल्यास 2019मध्ये भाजपचा खेळ समाप्त होईल, असंही लालूप्रसाद यादव म्हणाले आहेत. राष्ट्रीय जनता दलाच्या वर्धापनदिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी लालूप्रसाद यादव यांनी भाजपावरही टीका केली. प्रियंका गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि त्यांचे कुटुंबीयांना भाजपा सरकार विनाकारण टार्गेट करत आहे. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाचे मायावती हे दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे. हे दोघे एकत्र आल्यास भाजप समाप्त होईल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे.
अखिलेश, मायावती एकत्र आल्यास 2019ची लोकसभा जिंकू- लालूप्रसाद यादव
By admin | Published: July 05, 2017 8:41 PM
राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश आणि मायावती यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने कालिया नागाने कलयुगात पुर्नजन्म घेतलाय. आम्ही कृष्णाप्रमाणेच या नागाला बिहारमधून पळवून लावले, अशा तिखट शब्दात लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनण्यासाठी पात्र नाहीत, असेही त्यांनी म्हटले होते. आणखी वाचा(नरेंद्र मोदी हे कलियुगातील कालिया नाग - लालूप्रसाद यादव)
(नरेंद्र मोदी बनलेत"NRI, त्यांना बनवा "जगाचे पंतप्रधान" - लालूप्रसाद यादव)
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदींची तुलना कालिया नागाशी केली होती. मोदींच्या रुपातील कालिया नाग आधी गुजरातला आणि आता संपूर्ण देशाला दंश करायला निघाला आहे, पण आम्ही कृष्णाप्रमाणेच या नागाला बिहारमधून पळवून लावले, असे त्यांनी म्हटले होते. आम्ही कोणत्याही जातीविरोधात लढा देत नसून आम्ही गरीबांसाठी ही लढाई करतोय असे त्यांनी नमूद केले होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी लालू यांनी पंतप्रधानांच्या विदेश दौ-यांच्या पार्श्वभूमीवर "मोदी हे NRI (अनिवासी भारतीय) बनले आहेत" अशी टीका केली होती. पंतप्रधान मोदींसाठी "जगाचे पंतप्रधान" असे पद तयार करावे असे अपीलही जगभरातील नेत्यांसमोर केले होते. चारा घोटाळ्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयात आले असता त्यांनी पंतप्रधान मोदींवर आपल्या खास शैलीत टीका केली होती. " मोदी या देशाचे (भारत) पंतप्रधान आहेत, मात्र सर्वाधिक काळ ते देशाबाहेरच (विदेश दौ-यांमुळे) असतात. मोदींसाठी जगाचे पंतप्रधान असे पद तयार करावे, असे अपील मी जगभरातील नेत्यांना करू इच्छितो" असे ते म्हणाले होते.