हरिद्वार - योग गुरू बाबा रामदेव आपल्या खास शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. आजही एका विधानामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळेस त्यांनी देशाच्या वाढणाऱ्या लोकसंख्येवर भाष्य केले आहे. 'जी लोक दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देतील, त्यांना मतदानाचा अधिकार नसावा', असे परखड मत बाबा रामदेव यांनी मांडले आहे. शिवाय, माझ्याप्रमाणे जी लोक लग्न करणार नाहीत, त्यांना समाजात विशेष सन्मान मिळाला पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं आहे. हरिद्वारमध्ये एका कार्यक्रमाला बाबा रामदेव संबोधित करत होते.
- नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? या देशामध्ये जे माझ्याप्रमाणे विवाह करणार नाही, त्यांचा विशेष सन्मान करायला हवा. पण लग्न केल्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य जन्म देणाऱ्यांना मतदानाचा अधिकार नसावा.