शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस-ठाकरे गटातील वाद मिटणार? प्रभारी रमेश चेन्नीथला ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
2
मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार! अतिरेक्यांनी गावात केले बॉम्बस्फोट
3
जस्टिन ट्रुडोंच्या अडचणीत वाढ, कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सामील; भारताने फोटो आणि नाव पाठवले
4
डंका तर BSNL चाच वाजणार! मोबाईलवर ३६००० किमीवरून मेसेज आला, हॅलो इंडिया; नवी स्वदेशी टेक्निक...
5
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
6
"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका
7
Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन'
8
गर्लफ्रेंडच्या घरी प्रेमीयुगुलाची भेट, पण कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडलं; बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं...
9
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
10
OTT साठी Reliance ची मोठी तयारी, JioCinema चं डिस्ने+ हॉटस्टारमध्ये विलीनीकरण होणार
11
रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा
12
दीड, दोन गुंठ्यात बांधलेले अप्रतिम घर; हॉल, बेडरुमही प्रशस्त... कसे बांधाल, एकदा पाहूनच घ्या ना...
13
खेडमध्ये सर्वपक्षीय विरोधक एकवटले, दिलीप मोहिते-पाटलांविरोधात देणार नवा पर्याय
14
भारताची 'युवासेना' आज पाकिस्तानशी भिडणार; टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? जाणून घ्या सर्वकाही
15
नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा
16
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
17
IPO पूर्वीच NSDL नं रचला इतिहास; भारत, जपान, जर्मनीच्या GDP पेक्षा अधिक झाल्या सिक्युरिटीज
18
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
19
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
20
"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट

बाळासाहेब असते तर..

By admin | Published: September 30, 2014 2:05 AM

राजकारणात ‘जर तर’ला कवडीची किंमत नसते. जे आज दिसतंय, जे घडतंय तेच वास्तव; बाकी बकवास! महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आजच्या राजकीय कालखंडात असते तर त्यांनी काय केले असते?

राजकारणात ‘जर तर’ला कवडीची किंमत नसते. जे आज दिसतंय, जे घडतंय तेच वास्तव; बाकी बकवास! महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आजच्या राजकीय कालखंडात असते तर त्यांनी काय केले असते? या कालखंडात क्रांतिसिंह नाना पाटील यांची भूमिका काय असली असती? अथवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब असते तर.. अशा विषयांचे वेिषण आणि तशा प्रश्नांच्या उत्तरांची मांडणी केवळ वैचारिक-तार्किक आधारावर केली जाऊ शकते; पण त्या मांडणीला वर्तमानात फारसा वास्तववादी अर्थ नसतो. पण आज ‘जर तर’चा विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचार शुभारंभानिमित्ताने धडाडलेल्या तोफेमुळे उद्धव ठाकरे यांनी अनंत गितेंच्या केंद्रीय मंत्रिपदावर पाणी सोडायला लावले. ठाकरे परिवार राजकारणात भलेही दुभंगलेला असेल; पण त्यांच्या लेखी मात्र ‘बाळासाहेब असते तर..’ या मुद्याला तहहयात महत्त्व आहे. कारण, व्यक्तिमत्त्व, सामाजिक दृष्टिकोन, मानसिक जडणघडण आणि संस्कार या प्रत्येक घटकावर या कुटुंबावर ‘ठाकरे शैली’चा नैसर्गिक आणि ठसठशीत प्रभाव राहिलेला आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी बिंबविलेल्या प्रत्येक संस्काराची साक्ष देणारी कृती ठाकरेंच्या प्रत्येक पिढीकडून होताना महाराष्ट्राला दिसली. वक्तृत्वातील ठाकरे शैलीबद्दल बोलायचे झाले तर, प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना ‘गर्दीची भाषा’ बोलण्याचा कानमंत्र दिला होता. तो मंत्र बाळासाहेबांनी आयुष्यभर जतन केला आणि उभ्या महाराष्ट्राने बाळासाहेबांची भाषणो डोक्यावर घेतली. संयुक्त महाराष्ट्र निर्मिती असो वा बेळगाव कर्नाटक सीमाप्रश्नांसारखे ज्वलंत आणि जिव्हाळ्याचे सामाजिक विषयही काळाने त्या वेळी त्यांना दिले. राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व ‘ठाकरे शैली’ने ठासून भरलेले आहे. पण त्यांच्या त्या व्यक्तिमत्त्वाला साथ देणारे विषय आणि परिस्थिती आहे का? मनसेच्या आजच्या वाटचालीतील अडथळे नेमक्या याच प्रश्नाच्या उत्तरात दडले आहे. राज यांच्या तोफेचा परिणाम सेना पक्षप्रमुख आणि अनंत गितेंच्या मंत्रिपदावर जरूर झाला; पण महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे काय? राज नव्या पिढीचे ‘टेक्नो सॅव्ही’, सामाजिक मानसशास्त्रचा अभ्यास व महत्त्व जाणणारे आणि कोणत्याही कृतीच्या ‘टायमिंग’वर जबरदस्त प्रभुत्व असलेले पुढारी मानले जातात. पण लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या कालावधीत त्यांच्याकडून पडलेल्या प्रत्येक पावलातून त्यांच्यात गुणवैशिष्टय़ांचा प्रभाव गायब झाल्याचे महाराष्ट्राने अनुभवले. अलीकडच्या काळात तर ‘टायमिंग’च्या बाबतीत ते दुर्दैवीच ठरले. बहुचर्चित ‘ब्लू प्रिंट’ महाराष्ट्रापुढे ठेवण्याचा दिवसच उदाहरणादाखल घ्या- अनेक वृत्तवाहिन्यांवरुन तो कार्यक्रम ‘लाईव्ह’ दाखविला जात होता आणि त्याच वेळी युती व आघाडीच्या महाफुटीचा मुहूर्त निघाला! सर्वाचे लक्ष ‘ब्लू प्रिंट’वरुन महाफुटीकडे कधी वळले हेही कळले नाही. मोदीसमर्थन ते कालचा प्रचार शुभारंभ या वाटचालीत राज ठाकरेंचे चुकले कुठे? या प्रश्नांचे रोखठोक उत्तर स्वत: राज यांनीच शोधण्याची वेळ आली आहे. मतांच्या राजकारणात उन्नीस-बीस होत राहते. पण ज्यांच्याकडे ‘लंबी रेस के घोडे’ म्हणून तमाम महाराष्ट्र आशेने आणि आदराने पाहतो, त्या नेत्यांनी स्वत:शी संवाद वाढवायला नको का? ‘जर तर’च्या महाजालात गुंतण्यापेक्षा त्या वास्तवाशी पक्की मैत्री जडविणोच राज ठाकरेंच्या वाटचालीस फलदायी ठरेल..
 - राजा माने