नवी दिल्ली - भजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह (Digvijay singh) यांची एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. हा ऑडिओ क्लबहाउस चॅटचा आहे. यात दिग्विजय सिंह आर्टिकल-370 संदर्भात बोलत आहेत. या ऑडिओमध्ये, जर काँग्रेस सत्तेत आली तर आर्टिकल 370 हटविण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार केला जाईल, असे दिग्विजय सिंह बोलताना असल्याचे ऐकू येत आहे. (If Congress comes to power reconsider 370, Digvijay singh's discussion with Pakistani journalist, BJP's claim)
केंद्रातील भाजप सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविले आहे. तसेच, जम्मू-काश्मीर आणि लडाखचे दोन केंद्र शासित प्रदेशांत विभाजनही केले आहे.
अमित मालवीय ( Amit Malviya) यांनी दावा केला आहे, की या चॅटमध्ये पाकिस्तानी पत्रकारही होते. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, "क्लबहाउस चॅटमध्ये राहुल गांधींच्या जवळचे नेते दिग्विजय सिंह पाकिस्तानी पत्रकाराला बोलत आहेत, जर काँग्रेस सत्तेत आली, तर आर्टिकल 370 हटविण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार केला जाईल. खरच? हीच तर पाकिस्तानची इच्छा आहे..."
" जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील"
नेमकं काय बोलतायत दिग्विजय सिंह? ऑडिओमध्ये काय ऐकायला येतंय? -या चॅटमध्ये दिग्विजय सिंह बोलताना ऐकू येत आहे, की "त्यांनी जेव्हा काश्मीरचे आर्टिकल 370 हटविले, तेव्हा तेथे लोकशाही नव्हती. तेथे मानवताही नव्हती, कारण सर्वांनाच कारागृहात डांबण्यात आले होते. काश्मिरियत्व तेथील धर्मनिरपेक्षतेचा भाग आहे. कारण मुस्लीम बहूल राज्याचा राजा हिंदू होता आणि दोघेही सोबतीने काम करत होते. एवढेच नाही, तर काश्मिरात कश्मिरी पंडितांना सरकारी नौकरीत आरक्षणही देण्यात आले होते. अशात आर्टिकल 370 हटविण्याचा निर्णय अत्यंत वाईट होता आणि जेव्हा काँग्रेस सत्तेत येईल तेव्हा 370 हटविण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार केला जाईल."
दिग्विजय यांच्या ऑडिओनंतर भाजप आक्रमक - दिग्विजय यांची ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. बेगूसरायमधील भाजपचे खासदार तथा केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ट्विट करत काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले आहे, "पाकिस्तान हे काँग्रेसचे पहिले प्रेम आहे. दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींचाच मेसेज पाकिस्तानपर्यंत पोहोचवला आहे. काश्मीर बळकावण्यात काँग्रेस पाकिस्तानची मदत करेल.